आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाप्रलयापासून बचावासाठी ७० अब्ज रुपयांचा अालिशान खंदक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोथेनस्टेन- अमेरिकी व्यावसायिक रॉबर्ट विसिनयो यांनी महाप्रलयापासून बचावासाठी जर्मनीतील एक गाव रोथेनस्टेनमध्ये अब्जावधी डॉलर खर्च करून अालिशान खंदक तयार केला आहे. हा खंदक अणुस्फोट, भूकंप, सुनामी आणि अशाच आपत्तींचा सामना करण्यास सक्षम आहे.

या खंदकात जलतरण तलाव, चित्रपटगृह, जिम, रेस्तराँ आणि स्वत:च्या हेलिकॉप्टर सेवेसह पंचतारांकित हॉटेलसारखी सुविधा आहे. आपण खूप धोकादायक स्थितीत राहत असून त्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. आपण प्रलयाला सामोरे जाण्याची मानसिकता केली पाहिजे. ७० अब्ज रुपये खर्च केलेला हा खंदक अब्जाधीशाचा बंगला किंवा मेगा याॅटपेक्षा मोठा आणि अालिशान आहे.