आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: हे आहेत पृथ्वीवरचे फ्लाईंग माऊंटन्स, जगातील सात आश्चर्यांमध्ये समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या नै‍सर्गिक सौंदर्यासाठी जगात अनेक पर्यटन स्थळे प्रसिध्‍द आहेत. यापैकीच एक आहे माचू पिचू. दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात असलेल्या माचू पिचूचा जगातील सर्वात उंच अशा पर्यटन स्थळांमध्‍ये समावेश होतो. अँडीज पर्वतांवर असलेल्या माचू पिचू नावाचे प्रसिध्‍द प्राचीन पुरावशेष पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. या स्थळाचा जगातील 7 आश्‍चर्यांच्या यादीमध्‍ये समावेश होतो. माचू पिचूचा शोध 24 जुलै, 1911 मध्‍ये अमेरिकन पुरातत्त्व शास्त्रज्ञ हॅराम बिंगम यांनी लावला होता. मात्र याबाबतही मतभेद आहेत.
शिवाय येथे आल्यावर आपण अवतार चित्रपटातील फ्लाईंग माऊंटन्स बघतोय असे वाटते. येथील पर्वतरांगा ढगांच्या कुशीत असल्याचा भास होतो. वातावरणातील थंडावा जाणवतो.

पुढे पाहा माचू पिचूची छायाचित्रे....