आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे होऊ शकतात फ्रान्सचे नवे राष्ट्राध्यक्ष; 25 वर्षांनी मोठ्या शिक्षिकेसोबत थाटला संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राथमिक निकालात इमेन्युअल यांना सर्वाधिक 23.9 टक्के मते मिळाली आहेत. (फाईल) - Divya Marathi
प्राथमिक निकालात इमेन्युअल यांना सर्वाधिक 23.9 टक्के मते मिळाली आहेत. (फाईल)
पॅरिस - फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत टप्प्यातील मतदानाचे प्राथमिक निकाल पुढे आले. यात एन मार्श मूवमेंटचे नेते इमेन्युअल मॅक्रोन उजव्या विचारसरणीच्या नेत्या मरीन ली पेन यांच्यात चुरशीची लढत झाली. यानंतर 7 मार्च रोजी पुढील टप्प्यात ली पेन आणि इमेन्युअल यांच्यात थेट लढत होणार आहे. प्राथमिक टप्प्यात इमेन्युअल यांना सर्वाधिक 23.9 टक्के मते मिळाली आहेत. 
 
इमेन्युएल यांना सर्वाधिक मते
फ्रान्समध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानात एकूण 11 उमेदवारांचे प्राथमिक निकाल पुढे आले. त्यामध्ये इमेन्युअल यांना सर्वाधिक 23.9 टक्के मते मिळाली आहेत. तर, त्यांच्या सर्वात जवळच्या प्रतिस्पर्धी ली पेन यांना 21.4 टक्के मते मिळाली आहेत. ही माहिती फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने सोमवारी जाहीर केली. यात ली पेन कट्टर उजव्या विचारसरणीवर तर, इमेन्युअल उदारमतवादी विचारांवर निवडणूक लढवत आहेत.
 
कोण आहेत इमेन्युअल
सनदी सेवक, आणि गुंतवणूकदार तसेच बँकर राहिलेले इमेन्युअल यांनी 2006 ते 2009 पर्यंत सोशलिस्ट पक्षाचे सदस्य होते. 2012 मध्ये फ्रँकोस ओलांद यांची सत्ता असताना त्यांना पक्षाचे जनरल सेक्रेटरी करण्यात आले. 2014 मध्ये पक्षाने त्यांना अर्थमंत्री पद सुद्धा दिले. तसेच 2017 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पक्षाचा चेहरा म्हणून समोर आणले.
 
17 वर्षांचे असताना शिक्षिकेच्या प्रेमात, विवाह
वयाच्या 17 व्या वर्षी आपल्याहून तब्बल 25 वर्षांनी मोठ्या शिक्षिका ब्रिजेट ट्रोगन्युक्स यांच्या प्रेमात पडले. यानंतर 2007 मध्ये दोघांनी विवाह थाटला. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे प्राथमिक निकाल पाहता आणि एक्झिट पोल लक्षात घेता 39 वर्षीय इमेन्युअल राष्ट्राध्यक्ष आणि 64 वर्षीय ब्रिजेट फ्रान्सच्या प्रथम महिला ठरणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
 
कट्टर उजव्या ली पेन
- राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नॅशनल फ्रंट पार्टीच्या कट्टर नेत्या मरीन ली पेन यांनी फ्रान्सच्या सर्वच मशीदी बंद पाडणार असे आश्वासन दिले. एवढेच नव्हे, तर देशात तिरस्काराची भावना पसरवणाऱ्या सर्व मुस्लिम धर्मगुरूंना देशातून हकलून दिले जाईल आणि देशाच्या सीमा शर्णार्थींसाठी बंद केल्या जातील. 
- देशात कट्टरतावाद पसवणाऱ्यांवर देशाच्या सुरक्षा यंत्रणांची करडी नजर ठेवली जाणार आहे. या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांना देशातून हकलून दिले जाईल. अशा व्यक्तींकडे फ्रान्सचे नागरिकत्व असेल तर, ते सुद्धा काढून घेतले जाईल. 
- ली पेन निवडून आल्यास त्या फ्रान्सच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरतील. 2012 च्या निवडणुकीत त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा... इमेन्युअल यांच्या पत्नी ब्रिजेट...
 
बातम्या आणखी आहेत...