आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्वालालंपूरमध्ये मदरशाला आग; 22 विद्यार्थ्यांसह 24 ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे एका मदरशाला गुरुवारी लागलेल्या भीषण आगीत २४ जण ठार झाले. मृतांमध्ये २२ विद्यार्थी आणि दोन वॉर्डनचा समावेश आहे. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.  
 
क्वालालंपूरच्या एका उपनगरात इस्लामिक स्टडी सेंटरमध्ये ही भीषण आग लागली. खिडक्यांना लोखंडी जाळ्या असल्याने सर्व जण डॉर्मिटरीत अडकून पडले होते. मृतांमध्ये १३ ते १७ वयोगटातील २२ मुलांचा तसेच दोन शिक्षकांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह एकावर एक पडलेले आढळले. आगीपासून वाचण्यासाठी मुलांची एकच गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली असावी, असेही दिसत आहे. अग्निशमन दलाने तासाभरात आग आटोक्यात आणली, पण तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.  

मदरशाच्या समोरच राहणाऱ्या नूरहयाती अब्दुल हलीम (४६) या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ‘प्रार्थनेसाठीची घंटा वाजत असतानाच आग लागली. मला ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मला वाटले भांडण झाले असावे. मी घराची खिडकी उघडली तेव्हा मदरशाला आग लागल्याचे दिसले. विद्यार्थी मदतीसाठी मोठमोठ्याने ओरडत होते, पण मी काहीही करू शकले नाही. अग्निशमन दल येईपर्यंत किंचाळण्याचे आवाज बंद झाले होते.’ 
बातम्या आणखी आहेत...