नवी दिल्ली - अमेरिकन नियतकालिक ‘फॉर्च्युन’ने आपल्या मुखपृष्ठावर अमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजो यांना भगवान विष्णंूच्या अवतारात दाखवले अाहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्याला अमेरिकेतील भारतीयांनी आक्षेप घेतल्यानंतर फॉर्च्युनचे मुख्य संपादक अॅलन मरे यांनी ट्विटरवरून जाहीरपणे माफी मागितली.
फॉर्च्युनने जानेवारीच्या अंकात बेजो यांची बातमी दिली आहे. भारतात व्यापार वाढवण्यासाठी बेजाे यांनी केलेल्या प्रयत्नांवर फॉर्च्युन नियतकालिकाने ‘अमेझॉन इनवेड्स इंडिया’ शीर्षकाखाली ही प्रमुख बातमी प्रसिद्ध केली आहे.