आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंगापूरात असा साजरा होतोय महाराष्‍ट्र मंडळाचा गणेशोत्‍सव, पाहा हे 30 Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर- सिंगापूर येथील महाराष्‍ट्र मंडळाच्‍या वतीने यंदा सिंगापूरात मोठ्या थाटात गणेश उत्‍सव साजरा केला जात आहे. मंडळाच्‍या वतीने 5 दिवसीय गणेशोत्‍सव साजरा केला जात असून आज सायंकाळी श्रींची विसर्जन मिरवणूक आहे. 5 ते 10 सप्‍टेंबर या कालावधित सिंगापूरात गणेशोत्‍सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले. सिंगापूरातील नागरिकांनी उत्‍स्‍फुर्तपणे या कार्यक्रमांमध्‍ये सहभाग घेतला. ग्‍लोबल इंडियन इंटरनॅशनल स्‍कुल, क्‍विनस्‍टोन, सिंगापूर येथे हा गणेशोत्‍सव साजरा होत आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍या येथील सुंदर फोटो दाखवत आहोत. या उत्‍सवात ऐतिहासिक साहित्‍यवाचन, कॉर्पोरेट कीर्तन, सभासदांच्‍या गायनाचा कार्यक्रम व विविध सांस्‍कृतिक कार्यक्रम घेण्‍यात आले. दररोज सकाळी साडेसात वाजता गणपती बाप्‍पांची आरतीसाठी भक्‍त एकत्र येतात.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, सिंगापूरातील गणेशोत्‍सवाचे खास फोटो..
बातम्या आणखी आहेत...