आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Basaveshwar Statue In London News In Marathi

महात्मा बसवेश्वरांचा लंडनमध्ये पुतळा, नरेंद्र माेदींना निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- बाराव्या शतकातील थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या थेम्स नदीच्या किनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या भव्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.


लंडनच्या प्रांतीय परिषदेचे माजी महापौर डॉ. नीरज पाटील यांनी पुतळा उभारणीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी नवी दिल्लीत मंगळवारी मोदी यांची भेट घेऊन या साेहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. येत्या जून-जुलै महिन्यात हा सोहळा अपेक्षित आहे.

डॉ. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी बसवेश्वरांप्रती आदरांजली व्यक्त करत त्यांच्या शिकवणीचा मोठा चाहता असल्याचे सांगितले. ब्रिटिश संसद आणि बिग बेन बेलच्या पार्श्वभूमीवर पुतळा स्थापन केल्याबद्दल मोदी यांनी भारतीयांचे अभिनंदन केले. बसवेश्वरांचा जन्म ११३४ मध्ये कर्नाटकमध्ये झाला. गुलबर्गा जिल्ह्यातील कमालपूर येथे जन्मलेले डॉ. पाटील लंडनमधील आघाडीचे अनिवासी डॉक्टर असून १९९२ मध्ये गुलबर्गा येथे वैद्यकीय पदवी संपादन केल्यावर ते उच्चशिक्षणासाठी लंडनमध्ये आले होते. ब्रिटनमध्ये त्यांनी गेल्या १४ वर्षांत २५ विविध आरोग्य संस्थांमध्ये आपत्कालीन सल्लागार म्हणून काम केले आहे.