आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi Honoured By UK With A Statue At Parliament Square News In Marathi

ब्रिटनमध्ये महात्मा गांधींचा पुतळा; विंस्टन चर्चिल यांनी संबोधले होते \'अर्धनग्न फकीर\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: ब्रिटन पार्लमेंट स्क्वेअरमध्ये उभारण्यात आलेला महात्मा गांधींचा कांस्य धातूचा पुतळा)
लंदन/नवी दिल्ली- ब्रिटनमधील ऐतिहासिक पार्लमेंट स्क्वेअरमध्ये आज (शनिवारी) राष्‍ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण झाले. भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते महात्मा गांधींच्या कांस्य धातूच्या पुतळ्याचे अनावरण झाले. या सोहळ्यास बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.
विशेष म्हणजे महात्मा गांधींचा पुतळा पार्लमेट स्क्वेयरमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांच्या शेजारी उभारण्यात आला आहे. विंस्टन चर्चिल यांनी गांधींना एके काळात 'अर्धनग्न फकीर' असे संबोधून हीन वागणूक दिली होती. तसेच महात्मा गांधी आजच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले होते. या घटनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार फिलिप जॅक्सन यांनी केली आहे. महात्मा गांधी असे एकमेव महापुरुष आहेत की, भारतासह 70 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.
अमेरिकेत महात्मा गांधी यांचे 30 पुतळे आहेत. रशिया आणि चीनमध्ये देखील महात्मा गांधींचे पुतळे उभारण्यात आले आहेत. यावरून महात्मा गांधींच्या महान कार्याचा आपल्याला अंदाज येतो. परंतु, पाकिस्तानमध्ये महात्मा गांधी यांचा एकही पुतळा नाही. पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार अब्दुल मजीद छपरा यांनी दावा केला आहे की, कराचीमध्ये गांधींची एक पुतळा होता. छपरा यांच्या मते, सिंध हायकोर्ट बिल्डिंगसमोरील मार्गावर गांधींचा पुतळा होता. हा मार्ग पूर्वी किंग्ज वे नावाने ओळखला जात होता.
दरम्यान, इस्लामाबादमधील 'पाकिस्तान मॉन्युमेंट म्युझियम'मध्ये महात्मा गांधींचा एक पुतळा आहे. परंतु, मोहम्मद अली जिना यांच्यासोबत महात्मा गांधी आहेत. मीडियाच्या एका अहवालानुसार, गांधी पीस फाऊंडेशन नामक एक संस्था आहे. या संस्थेचे कार्यकर्ते गांधींचा पुतळा उभारण्याचे कार्य करतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, कोण-कोणत्या देशांत आहेत राष्‍ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा...