बॅंकॉक- थायलंडची राजधानी बॅंकॉकमधील प्रसिद्ध ब्रह्मा मंदिराजवळ झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात 27 जणांचा मृत्यू झाला असून 80 पेक्षा गंभीर जखमी झाले आहेत. आज सायंकाळी सहाच्या सुमारास हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. इरावण मंदिर अशीही या मंदिराची ओळख आहे. मध्य बॅंकॉकमधील फाईव्ह स्टार हॉटेलच्या शेजारीच हे मंदिर आहे.
दुचाकीमध्ये बॉम्ब लावून स्फोट घडविण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी घेतलेली नाही. या स्फोटात विदेशी पर्यटक मृत्युमुखी पडले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बुद्धिस्ट लोकांसाठीही हे मंदिर श्रद्धेचे स्थान होते. दररोज हजारो बुद्धिस्ट भाविक या मंदिरात येत असत. या मंदिराच्या शेजारी तीन मोठे शॉपिंग मॉल आहेत.
दरम्यान बँकॉकमधील भारतीय दुतावासाने भारतीयांच्या मदतीसाठी इमर्जेंसी नंबर दिले आहे. ती अशी... +66618819218 /लँडलाइन नंबर : + 6622580300-5
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, बॉम्बस्फोटाची छायाचित्रे....