Home »International »Other Country» Major Clean Up Operation In Pattaya City Of Thailand

थायलंड वेश्या व्यवसायामुळे बदनाम, आता अश्लील शो व बार होणार बंद

दिव्यमराठी वेब टीम | Apr 20, 2017, 13:26 PM IST

  • बँकाक शहरातील रात्रीचा नजारा...
इंटरनॅशनल डेस्क- थायलंडची सेक्स इंडस्ट्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. देशाच्या पर्यटन मंत्री कोबकर्ण वोत्तानवरंगकुल यांनी हा उद्योग लवकरच बंद करायचाच असा चंग बांधल्यानंतर आता तेथील गर्वनर यांनाही सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसायाला परवानगी देणार नसल्याचे ठणकावून सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून स्थानिक पेलिस काही मोठ्या वेश्‍यागृहांवर धाडी टाकत आहेत. मात्र वेश्‍या व्यवसाय बंद केल्यास थायलंडच्या पर्यटन उद्योगावर याचा मोठा परिणाम होईल, असे या वेश्या व्यवसायाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे. अडीच लाख महिला करतात वेश्‍या व्यवसाय...
- थायलंडमध्ये 2 लाख 50 हजार लोक वेश्‍याव्यवसायात गुंतले आहेत. मात्र हे आकडे आणखी जास्त असू शकतात.
- येथील एका दिवसाची कमाल रोजंदारी 570 रुपये आहे. रस्त्यावर वेश्‍याव्यवसाय करणारे सेक्स वर्कर्स ए‍का दिवसात 220 रुपये कमावू शकतात. उच्चभ्रू ग्राहकाकडून ते 5 हजार 700 रुपयांपर्यंत कमावू शकतात.
- थायलंडच्या देशांतर्गत विकास दरात पर्यटन उद्योगाचे योगदान 10 टक्के आहे.
- गेल्या 70 वर्षांपासून थायलंडमध्ये वेश्‍याव्यवसाय बेकायदेशीर आहे. तरीही याला आग्नेगय आशियातील सेक्स टुरिझमचे केंद्र मानले जाते.
- पटाया येथील मुख्‍य सेक्स टुरिझम केंद्र आहे. येथे एक हजारापेक्षा जास्त बार व मसाज पार्लर आहेत. यांच्या आड मोठ्या प्रमाणावर वेश्‍याव्यवसायाचे रॅकेट चालवले जात आहे. आता येथील बार आणि तेथे चालणारे अश्लील शो बंद केले जाणार आहेत.
वेश्‍यांसाठी पर्यटक येत नाहीत - पर्यटन मंत्री
- पर्यटन मंत्री कोबकर्ण म्हणतात, आम्हाला थायलंडचे पर्यटन स्वच्छ ठेवायचे आहे. आम्ही सेक्स इंडस्ट्री बंद करणार आहोत. पर्यटक यासाठी येथे येत नाहीत. ते आमचे सुंदर संस्कृती पाहण्‍यासाठी येतात.
शेजारील देश इंडोनेशियातही वेश्‍याव्यवसायाविरोधात लढा-
- मुस्लिम देश इंडोनेशियाने 2019 पर्यंत सर्व ब्रॉथल्स बंद करण्‍याचे लक्ष्‍य ठेवले आहे.
- गेल्या महिन्यात राजधानी जकार्तामधील शेकडो ब्रॉथल्स तोडले गेले.
- इंडोनेशियात वेश्‍याव्यवसायावर प्रत्येक महिन्यात 615 कोटी रुपये खर्च केले जातात. अशा स्थितीत ब्रॉथल्स तोडल्याने देशाची अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
- इंडोनेशियात 1 लाख 40 हजारांपासून 2 लाख 30 हजार वेश्‍या आहेत. त्यांना लोअर, मिडल, अप्पर आणि एलिट क्लास असे वर्गीकरण केले आहे.
- येथे सेक्स सेक्टरचे आर्थ‍िक वाटा 8 हजार कोटींपासून 22 हजार कोटी रुपयांदरम्यान आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कशा पध्‍दतीने थायलंडच्या पटाया शहरात चालते नाइटलाईफ...
तसेच वाचा, जगभर काय आहे वेश्याव्यवसायाची स्थिती....

Next Article

Recommended