आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO: जपानमध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप, दिल्लीतही धक्के, सुनामीचा इशारा नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाचे तीव्रता 7.8 मोजण्यात आली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया आणि न्युझिलंडमध्येही 5.5 तीव्रतेचे धक्के बसले आहेत. भारताची राजधानी दिल्लीतही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही.
जपानमध्ये आलेल्या भूकंपाचे केंद्र बोनिन द्वीपवर असल्याचे सांगितले जात आहे. जपानची राजधानी टोकियोत भूकंपाचे जबर धक्के बसले आहेत. अनेक इमारती जोरदार हलल्या असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या नुकसानीचे वृत्त नाही.
जमिनीपासून 677 किलोमीटर होते केंद्रबिंदू
जपानमध्ये आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू बोनिन आयलंडमध्ये जमिनीपासून 677 किलोमीटर आत होता, असे पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटरने सांगितले आहे. येथून चीची-शिमा हे बेट जवळ आहे. 189 किलोमीटर असलेल्या या बेटाची लोकसंख्या सुमारे 2000 आहे. सध्या जपानमधील सर्व सबवे ट्रेन रोखण्यात आल्या आहेत.
एक मिनिट हलत होत्या इमारती
टोकियोमधील अनेक बहुमजली इमारती भूकंपामुळे सुमारे एक मिनिट हलत होत्या. त्यामुळे लोक घाबरुन रस्त्यावर आले. नेपाळसारखाच भूकंप जपानमध्ये आला आहे, असे त्यांना वाटले. बऱ्याच इमारतींमधील सामानाचे, वस्तूंचे नुकसान झाले आहे.
प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबिती
चीचीजिमा बेटावर गेस्ट हाऊस चालविणारे योशियुकी सासामोटो यांनी सांगितले, की सुरवातीला हलका झटका बसला. त्यानंतर एक आला आणि थांबला. पण त्यानंतर जोरदार झटका बसला. तेव्हा मी उभाही राहू शकत नव्हते. चलणे तर दूरच राहिले.
न्युक्लिअर प्लांट सुरक्षित
जपानमधील न्युक्लिअर प्लांट सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. 2011 मध्ये आलेल्या सुनामीत फुकुशिमा पावर प्लांटमध्ये रेडिएशन पसरले होते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी बरेच महिने लागले होते.
दिल्लीत नुकसान नाही
भारताची राजधानी आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे मध्यम स्वरुपाचे धक्के जाणवले. पण कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
पुढील स्लाईडवर व्हिडिओत बघा, जपानमध्ये असे बसले भूकंपाचे धक्के.... का येतो भूकंप...
बातम्या आणखी आहेत...