आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक सीमेवर स्वीडनच्या मेजर गुस्ताफा यांची निगराणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे - स्वीडनचे मेजर जनरल पेर गुस्ताफ लोदिन जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीच्या सीमारेषेवर निगराणी ठेवणार आहेत. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी त्यांना युनायटेड नेशन्स मिलिटरी ऑब्झर्व्हर ग्रुपचे (यूएनएमओजीआयपी) नवे प्रमुख केले आहे.

मेजर गुस्ताफ (५९) घानाचे मेजर जनरल डेलाली जॉन्सन साकी यांची जागा घेतील. साकी आपला कार्यकाळ २ जुलै रोजी पूर्ण करत आहेत. गुस्ताफ स्विस लष्करात डायरेक्टर ऑफ प्रोक्योरमेंट अँड लॉजिस्टिक्सपदावर तैनात आहेत. दरम्यान, १९७२ मधील सिमला करार आणि नियंत्रण रेषेच्या स्थापनेनंतर यूएनएमओजीआयपीचे महत्त्व राहिले नसल्याचे भारताचे म्हणणे आहे.

यूएनएम ओजीआयपीचे काम काय? : यूएनएम ओजीआयपी युद्धबंदी रेषा आणि त्याच्या आसपास होणाऱ्या युद्धबंदी उल्लंघनावर लक्ष ठेवण्याचे काम करते. संयुक्त राष्ट्राला यासंबंधीचा अहवाल द्यावा लागतो. शिवाय युद्धबंदीच्या शक्यतेबाबतही अहवाल द्यावा लागतो. या वर्षी ३१ मार्चपर्यंत यूएनएमओजीआयपीच्या ४४ सैन्य निरीक्षक, २५ आंतरराष्ट्रीय नागरी कर्मचारी आणि स्थानिक नागरी विभागाचे ४७ सदस्य होते. संयुक्त राष्ट्राच्या अर्थसंकल्पातून या संघटनेला आर्थिक मदत मिळते.
बातम्या आणखी आहेत...