इंटरनॅशनल डेस्क - कंबोडिया लॅन्डमाइन्स अर्थात भूसुरुंगांचे घर म्हणून जगभरात ओळखल्या जाते. तब्बल 3 वर्षे युद्धात घालवणाऱ्या या देशाला अफगाणिस्तानसारखीच भूसुरुंगांची देणगी मिळाली आहे. ह्या लॅन्डमाइन्स काढण्याचे घातक काम आजही सुरूच आहे. कंबोडिया सरकारच्या आकडेवारीनुसार, देशभर जवळपास 60 लाखांहून अधिक भूसुरुंगा गाडल्या आहेत. त्यामुळे, या देशातील नागरिक प्रत्येक पाऊल जीव मुठीत धरून टाकत आहेत.
लॅन्डमाइन्स हटवण्यासाठी लागतील 20 वर्षे
- 1970-80 च्या दशकांमध्ये झालेल्या गृहयुद्धात वेग-वेगळ्या सरकारांनी आणि बंडखोरांनी देशभर भूसुरुंगा लावल्या होत्या.
- या भूसुरुंगांना मार्गी लावण्यासाठी कंबोडियन माइन अॅक्शन सेंटर नावे एक खास संस्था आहे. त्यानुसार, 1990 च्या दशकात देशभर तब्बल 1 कोटी भूसुरुंगा होत्या.
- त्यावेळी देशाची एकूण लोकसंख्या केवळ 90 लाख होती. अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर एकहून अधिक भूसुरुंगा गाडलेल्या होत्या.
- 1979 पासून आतापर्यंत भूसुरुंगांच्या स्फोटांमध्ये किमान 64 हजार लोकांचा जीव गेला. तसेच अनेक जण गंभीर जखमी आणि कायम अपंग झाले आहेत.
- जागो-जागी लावलेल्या भूसुरुंगांमुळे कित्येक लोक घराबाहेर पडण्यासही भीत आहेत. शेतकरी पीक घेण्यासाठी घाबरतो, तर लहान मुले बाहेर खेळायला भितात. बांधकाम आणि खोदकाम तर या ठिकाणी एक मोठे आव्हान आहे.
- 1990 नंतर आंतरराष्ट्रीय संघटना रेड क्रॉसने सुद्धा ते हटवण्यासाठी हातभार लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे, कामाला वेग आला आहे.
- तरीही सर्वच प्रकारच्या लॅन्डमाइन्स हटवण्यासाठी किमान 20 वर्षांचा कालावधी लागेल असा अंदाज वर्तवला जातो.
- भूसुरुंगा निकामी करण्यासाठी आता तज्ञांसह प्रशिक्षित उंदरांचा देखील वापर केला जात आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कंबोडियातील लॅन्डमाइन्स आणि पीडित, स्थानिकांचे फोटोज...