आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलाला झाली 18 वर्षांची, Refugee मुलींसाठी सुरू केली शाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींच्या शिक्षण हक्कासाठी लढणाऱ्या नोबेल पुरस्कारप्राप्त मलाला युसूफझईने 19 व्या वर्षात पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे या दिवसाचे औचित्य साधून तिने मुलींच्या शिक्षणासाठी सुरू केलेले काम पुढे नेले आहे. मलालाने सिरियातील रिफ्युजी मुलींसाठी लेबनन येथे एक शाळा सुरू केली आहे. या शाळेमध्ये 14 ते 18 वयोगटातील 200 मुली शिक्षण घेतील.
मलालावर 2012 मध्ये पाकिस्तानात शाळेतून घरी परतत असताना तालिबानने हल्ला केला होता. त्यात तिच्या डोक्याला गोळी लागली. पण त्या हल्ल्यातून मलाला बचावली. त्यानंतर ती लंडनला कुटुंबाबरोबर स्थायिक झाली. हल्ल्यानंतर तिने मुलींच्या शिक्षणासाठी सामाजिक कार्याला अधिक जोमाने सुरुवात केली. त्याचमुळे ती सर्वात लहान नोबेल विजेतीही ठरली. मलालाने तिच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही शाळा सुरू केली आहे.

सिरियातील वीर आणि प्रेरणादायी मुलींबरोबर वाढदिवस साजरा करायला मिळत असल्याचा आनंद असल्याचे मलाला यावेळी म्हणाली. शस्त्राच्या धाकाला न जुमानात शिक्षण घेत असलेल्या 2.8 कोटी मुलांच्या वतीने मी याठिकाणी आले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण सुरू ठेवण्याचे त्यांचे धाडस सर्वांनाच प्रेरणा देते. त्यामुळे त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे आपले कर्तव्य असल्याचे मलाला यावेळी म्हणाली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, या कार्यक्रमातील PHOTOS
बातम्या आणखी आहेत...