आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पाक आणि इस्लामला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानच जबाबदार : मलाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - नोबेल पुरस्कार विजेती मलाला यूसुफजई हिने पाकिस्तान आणि इस्लामला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानी लोकच जबाबदार असल्याचे वक्तव्य केले आहे. मलालाने हे वक्तव्य मलालाने हे वक्तव्य ईशनिंदेच्या आरोपात एका पाकिस्तानी विद्यार्थ्याला मारहाण करून मारल्याच्या प्रकरणात केले आहे. मशाल खान नावाचा हा विद्यार्थी खैबर पख्तूनख्वा येथील एका विद्यापीठात पत्रकारितेचे शिक्षण घेत होता. 

आपण इस्लामची शिकवण विसरलो 
- न्यूज एजन्च्या मते सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक असलेली मलाला मलाला (19) हिने शनिवारी एक व्हिडीओ मॅसेज जारी केला. यात मलाला म्हणाली, मला मशालच्या मृत्यूची माहिती आजच मिळाली आहे. ही घटना दहशत आणि हिंसेची आहे. मी त्याच्या वडिलांशी बोलले आणि त्यांनी शांतता तसेच धैर्याचा संदेश दिला. मी त्यांच्या संदेशाला सलाम करतो. 
- आपम तक्रार करतो की, इस्लामोफोबिया आहे. दुसरे देश बदनाम करत आहेत.  पण कोणीही इस्लाम आणि पाकिस्तानाला बदनाम करत नाही तर आपण स्वतःच तसे करतो. पाकिस्तानची प्रतिमा मलिन होण्यासाठी आपण स्वतःच जबाबदार आहोत. 
- मशाल खानचा अंत्यसंस्कार हा केवळ त्याचा नव्हे तर आपल्या धार्मिक शिकवणीचाही अंत्यसंस्कार आहे. आपण इस्लामची शिकवण विसरलो आहोत. त्यात आपल्याला शांती आणि धैर्याची शिकवण दिली जाते. 
- मलालाने फेसबूकवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...