आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलाला म्हणाली- पीडित काश्मिरी माझे बंधुभगिनी, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानची अल्पवयीन नोबेल पारितोषक विजेती मलाला युसुफझाईने काश्मिर मुद्दा आंतरराष्ट्रीय पटलावर नेल्याने सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय समुदाय, पाकिस्तान आणि भारताने काश्मिर प्रश्न सोडविण्यासाठी मिळून प्रयत्न करावेत, असे मलालाने म्हटले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काश्मिर धमसत असल्याने मलालाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यासंदर्भात मलाला युसुफझाई म्हणाली, की काश्मिरातील जनतेला, जगातील इतर लोकांप्रमाणेच, जगण्याचा मुलभुत अधिकार आहे... भीतीमुक्त आणि कोणत्या दडपण नसलेल्या वातावरणात जगण्याची संधी त्यांना मिळायला हवी.
संयुक्त राष्ट्रसंघ, आंतरराष्ट्रीय समुदाय, पाकिस्तान आणि भारताने यांना मी आवाहन करते, की चुकीच्या गोष्टी बरोबर करण्यासाठी मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. काश्मिरी जनतेला आदरयुक्त, सन्मानाचे आणि मुक्त जीवन जगण्याचा अधिकार आहे.
हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वाणीचा एन्काऊंटर झाल्यापासून काश्मिरमध्ये संचारबंदी लागू आहे. या घटनेला आता जवळपास दोन महिने झाले आहेत.
मलाला म्हणाली, की मी काश्मिरच्या लोकांसोबत आहे. 14 मिलियन काश्मिरी बहिणी आणि भाऊ कायम माझ्या हृदयाजवळ आहेत.
पुढील स्लाईडवर वाचा, मलाला युसुफझाईच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रिया... काय म्हणाल्या बलुचिस्तानच्या नेत्या...
बातम्या आणखी आहेत...