आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशिया : पुरात हजारो लोकांचे स्थलांतर, गावांना पुराचा वेढा, चार दिवसांपासून मुसळधार पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर- गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मलेशियातील पूर्वेकडील प्रदेश जलमय झाला आहे. पावसामुळे आलेल्या पुराने गावे वेढली गेली असून हजारो गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अद्याप जीवित हानीचे वृत्त नाही. 
 
मलेशियाच्या किनारपट्टीवरील गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. टेरेंगनू व केलांटन प्रदेशातील अनेक शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. अनेक गावांचे रस्ते जलमय झाल्याने त्यांचा जगाशी संपर्क तुटला आहे. पूर्व किनारपट्टीला नेहमीच अशा प्रकारच्या वादळी पावसाचा मुकाबला करावा लागतो. टेरेंगनू हा इंधनाच्या क्षेत्रातील अतिशय समृद्ध प्रदेश म्हणून आेळखला जातो. परंतु सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने या भागातील घरात पाणी शिरले आहे. हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
  
टेरेंगनू प्रदेशातील पुरात मदतकार्य देखील व्यापक पातळीवर सुरू आहे. लोकांच्या मदतीसाठी बचाव दलाचे ७०० वर अधिकारी सक्रिय आहेत. पुरात अडकलेल्या कुटुंबांना मदत पुरवली जात आहे. मदत मोहीम वेगाने राबवली जात आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतूक ठप्प झाली अाहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. बोट, ट्रकद्वारे गावकऱ्यांना मदत पुरवली जात आहे. केलांटनमध्ये १ हजार ३०० कार्यकर्ते मदत कार्यात आहेत. ३० बोटी व काही वाहनांद्वारे हे कार्य वेगाने सुरू आहे.  

थायलंडच्या सीमेवरही पूर, सतर्कतेचा इशारा
मलेशिया व थायलंडच्या सीमेवर गॉलॉक नदी वाहते. पुरामुळे गॉलॉक नदीने धोक्याची पातळी आेलांडली आहे. त्यामुळे थायलंडच्या सीमेवरही पूरस्थिती पाहायला मिळत आहे. आजूबाजूच्या गावांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना आहेत.  
 
 
बातम्या आणखी आहेत...