आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलेशियातील धार्मिक शाळेत आगीने हाहाकार, 23 विद्यार्थ्यांसह 25 जणांचा होरपळून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहाटेच्या सुमारास ही आग लागली. - Divya Marathi
पहाटेच्या सुमारास ही आग लागली.
क्वालालंपूर - मलेशियाच्या राजधानीतील एका धार्मिक शाळेत गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. या आगीत 23 विद्यार्थ्यांसह किमान 25 जणांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोहोचलेल्या अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच मदतकार्य देखील सुरू करण्यात आले आहे. ठार झालेल्या विद्यार्थ्यांचे वय 13 ते 17 वर्षांच्या जवळपास होते. 
 
 
- तहफीज दारुल कुरान इत्तिफाकिया नामक हे धार्मिक बोर्डिंग स्कूल क्वालालंपूरच्या मध्यवर्ती परिसरात आहे. याच्या दोन मजली इमारतीमध्ये सकाळी पावणे सहाच्या सुमारास आग लागली. 
- घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोहोचलेल्या अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आणि बचाव कार्य सुरू केले. 
- मात्र, तोपर्यंत 2 वॉर्डनसह 23 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. आगीत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे वय 17 वर्षांपेक्षा कमी आहे. 
 
 
ग्रिलमुळे बाहेर निघू शकले नाही
- फायर ब्रिगेड आणि मदत मोहिमेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर मुलांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाहरी बाजूंनी ग्रिल असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही.  
- प्राथमिक चौकशीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली. तरीही घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...