आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेपत्ता मलेशियन जहाजाच्या अपहरणाची भीती; समुद्री चाच्‍यांवर संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालम्पूर - गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेली मलेशियन जहाजाचे अपहरण झाले असावे, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये भारतीय वंशाचे कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
पश्चिम मिरीच्या सागरी प्रदेशातून ही जहाज बेपत्ता झाले आहे. ही जहाज बेपत्ता झाल्याची माहिती जहाजाच्या मालकांकडून देण्यात आल्यानंतर मलेशियाच्या तटरक्षक दलाने तपास करण्यास सुरूवात केली आहे. ही जहाज इंडोनेशियाच्या सागरी क्षेत्रात नेण्यात आली असावी. नाटुना बेटांच्या भागात जहाज दडवून ठेवण्यात आली असावी, असा मलेशियाच्या तपास अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. आग्नेय आशियातील सागरी क्षेत्रात सर्वाधिक चाचेगिरी होते. त्यामुळे चाच्यांनी अपहरण केले असावे. त्या दिशेने जहाजाचा शोध घेण्यात येत आहे.