आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधेयक मंजूर करा, अन्यथा निवडणुका, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टर्नबुल यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - कामगार सुधारणा विधेयक सिनेटने मंजूर न केल्यास संसदेची दोन्ही सभागृहे बरखास्त करून टाकू आणि २ जुलैला निवडणुका घेऊ, असा इशारा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कम टर्नबुल यांनी दिला अाहे. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सभागृहांची बैठक सात आठवड्यांच्या सुट्यांनंतर १८ एप्रिलपासून पुन्हा सुरू होईल.

टर्नबुल सोमवारी म्हणाले, श्रम सुधारणा विधेयकावर मतदान होणार असून सिनेटमधील लहान पक्ष ते अडवून धरण्याचे प्रयत्न करू शकतात. यात लेबर ग्रीन्स या पक्षांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत अर्थसंकल्पही ३ मेपर्यंत ढकलला जाऊ शकतो. आता खेळत बसण्याची वेळ गेली आहे. त्यामुळे सिनेटसाठी ही काम करण्याची संधी असून लेबर आणि ग्रीन्स पक्षांना विधेयके लटकवण्याचे धोरण संपवावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. ऑस्ट्रेलियात २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मात्र, राजकीय तज्ज्ञांच्या मते यंदाच येथे मध्यावधी निवडणुका पार पडू शकतात. टर्नबुल यांनी निवडणुकांची घोषणा करण्यापूर्वी हे विधेयक किमान सिनेटमध्ये नामंजूर होणे तरी गरजेचे आहे. फॅमिली फर्स्ट पक्षाचे सिनेटर बॉब डे यांनी या सुधारणेला सोमवारी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

टर्नबुल मागच्या वर्षी आले सत्तेत
पक्षातील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर टर्नबुल हे मागच्या वर्षी पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत सतत वाढ होत आहे. सोमवारी प्रथमच एका सर्वेक्षणात त्यांच्या साप्ताहिक लोकप्रियतेत घट नोंदवली गेली. गुरुवार ते रविवार या मागच्या आठवड्याच्या कालावधीत २०४९ मतदारांत हे सर्वेक्षण केले गेले.
बातम्या आणखी आहेत...