आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डाॅ. नाईकला नागरिकत्व दिले नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - वादग्रस्त धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक याला नागरिकत्व दिल्याच्या वृत्ताचे मलेशिया सरकारने खंडन केले आहे. गृह खात्याचे उपमंत्री दातुक नूर जजलान मोहम्मद म्हणाले की, मलेशियात नागरिकत्व घेण्यासाठी अनेक दशकं लागतात. एखादी व्यक्ती मलेशियन आई-वडिलांचे अपत्य असेल तरच नागरिकत्व दिले जाते. माध्यमांत यासंदर्भात येत असलेले वृत्त चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडे, हिंदू राइट्स अॅक्शन फोर्स नावाच्या भारतीय एनजीओने म्हटले आहे की, गृहमंत्री जाहिद हमीदी यांनी डॉ. झाकीर नाईकला नागरिकत्व दिल्याचा इन्कार केला, पण त्याला स्थायी रहिवासी दर्जा देण्याच्या प्रश्नावर त्यांनी चुप्पी साधली आहे. मलेशियन सरकारने नाईकला मोठे पाठबळ दिले आहे, असा आरोपही एनजीओने केला आहे.
बातम्या आणखी आहेत...