आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालीत हल्ल्यात २७ ठार, भारतीय सुरक्षित, १५३ ओलिसांची झाली सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बमाको- फ्रान्समधील अतिरेकी हल्ल्यानंतर आठवडाभरातच अतिरेक्यांनी शुक्रवारी माली या आफ्रिकन देशाची राजधानी बमाको येथे एका हॉटेलमध्ये १७० जणांना ओलीस ठेवले. लष्करी कारवाई करून १५३ जणांची सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे सर्व २० भारतीयांची सुखरूप सुटका झाली. अल कायदाशी संबंधित संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

अतिरेक्यांनी शुक्रवारी सकाळी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये गोळीबार करून तेथील लोकांना ओलीस ठेवले. त्यात १४० अतिथी आणि हॉटेलचे ३० कर्मचारी होते. त्यांच्या सुटकेसाठी मालीच्या लष्कराने फ्रान्स आणि युनोच्या अधिकाऱ्यांसोबत लष्करी कारवाई केली, पण अतिरेक्यांनी तोपर्यंत २७ जणांना ठार केले होते. नऊ तासांच्या कारवाईनंतर लष्कराने अतिरेक्यांच्या ताब्यातून हाॅटेलमधील सर्व ओलिसांची सुटका केल्याची माहिती मालीचे संरक्षणमंत्री टी. सलीफ यांनी वृत्तसंस्थेला दिली.