आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन कोर्टात विजय माल्या हजर; म्हणाले, भारतात माझ्या जीवाला धोका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माल्या यांच्यावर 17 बँकांचे 9 हजार 432 कोटींचे कर्ज थकीत आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
माल्या यांच्यावर 17 बँकांचे 9 हजार 432 कोटींचे कर्ज थकीत आहे. (संग्रहित फोटो)

लंडन- भारतातून पळून गेलेल्या विजय माल्या प्रत्यार्पण केसवर 4 ते 14 डिसेंबर 8 दिवसांच्या कालावधीत सुनावणी होणार आहे. 61 वर्षीय माल्या सोमवारी वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर झाले. प्री-ट्रायल दरम्यान त्याच्या वकिलाने सांगितले की, भारतात माल्या यांच्या जीवाला धोका आहे. त्यानंतर आता माल्याच्या सुरक्षाव्यवस्थेची माहिती देण्यासाठी भारत सरकार तयारी करत आहे. माल्यावर 17 बँकांचे 9 हजार 432 कोटींचे कर्ज थकीत आहे. अटक होण्यापासून वाचण्यासाठी माल्या मागील 2 वर्षांपासून देश सोडून गेला आहे. भारताने ब्रिटनला त्याच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केली आहे. 

 

 

लंडन कोर्टात कधी होणार सुनावणी?
- वेस्टमिंस्टर कोर्टाने सुनावणी दरम्यान सांगितले की,  4, 5, 6, 7, 11, 12, 13 आणि 14 डिसेंबर रोजी या प्रकरणात सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे 24 डिसेंबरला निकाल देण्यात येईल असे सांगण्यात येत आहे. 

- माझ्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप निराधार असल्याचाही दावा विजय मल्ल्याने केला आहे. याआधी विजय मल्ल्याने भारतातील तुरुंगांची अवस्था वाईट असल्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...