आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमरून यांना ममता बॅनर्जी यांचे बंगाल भेटीचे निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या इंग्लंडच्या दौ-यावर असून त्यांनी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांना कोलकात्याला पुन्हा भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे. कोलकाता हे पूर्वेकडील खरे प्रवेशद्वार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

कॅमरून यांनी कोलकात्याला निश्चितपणे भेट दिली पाहिजे. कारण हे शहर ख-या अर्थाने पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे. बॅनर्जी आणि कॅमरून यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी बॅनर्जी यांना पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली. लंडनमध्ये नसल्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही. परंतु नोव्हेंबर २०१३ चा दौरा मला आठवतो. त्यावेळी ब्रिटन-पश्चिम बंगाल यांच्यातील सहकार्य करारावर सहमती व्यक्त करण्यात आली होती, असे कॅमरून यांनी २४ जुलैच्या पत्रात म्हटले आहे. ब्रिटीश सत्तेच्या काळात इंग्लंडचा व्यापार कोलकात्यामार्गे सुरू झाला होता. पुन्हा
व्यापाराची तशीच सुरूवात होऊ लागली आहे, असे ममता म्हणाल्या. दरम्यान, बॅनर्जी यांचा हा पाच दिवसांचा दौरा आहे.

प्रदूषणमुक्त शहर : लंडन हे प्रदूषणमुक्त, हरित शहर म्हणून परिचित आहे. परंतु दोन्ही शहरात अनेक साम्ये आहेत. लंडनमध्ये महाराणी व्हिक्टोरियाचा पुतळा तर आमच्याकडे त्याविषयीचे स्मारक आहे.परंतु लंडन महागडे असल्याचे ममता म्हणाल्या.