आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक मगर पकडण्‍यासाठी पाण्‍यात टाकली उडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(धोकादायक मगर पकडण्‍यासाठी पाण्‍यात उडी टाकतांना जेसन )

कोलेराडो - मगर हा मोठमोठया जनावरांना काही क्षनात गिळून टाकते. मगरी जवळ जायला माणसं घाबरतात पण जगात काही लो‍क असे आहेत, जे या धोकादायक मगरींना घाबरत नाहीत. कोलोराडो येथील 34 वर्षीय रहिवासी जेसन यांनी मगरीला पकडण्‍यासाठी पाण्‍यात उडी घेतली. कोलोराडो येथील गेटर फॉर्ममध्‍ये येथील मच्‍छीमारांना या मगरींसोबत दररोज सामना करावा लागतो.

जेसन यांना नदीत एक जखमी मगर तरंगत असल्‍याचं दिसताच, त्‍यांनी जिवाची पर्वा न करता पाण्‍यात उडी घेउन जखमी मगरीला पकडून पाण्‍याबाहेर काढलं, आणि या मगरीचा उपचार करून पुन्‍हा पाण्‍यात सोडले. 'सध्या मगरींचा प्रजनंन हंगाम सुरू आहे. मगरी आपापसात खुप लढतात यात लहान मगरी जखमी होतात, नदीत तरंगत असलेल्‍या मगरीला पाहून अशीच शंका मनात आली अन मी क्षनाचाही विलंब न लावता पाण्‍यात उडी घेतल्‍याचे जेसन यांनी सांगितले.'
बातम्या आणखी आहेत...