आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार दिवसांनंतर ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर, जगण्यासाठी प्यायला Urine

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऋषिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. - Divya Marathi
ऋषिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काठमांडू - नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम अजूनही सुरुच आहे. फ्रान्सच्या बचाव पथकाने बुधवारी ऋषि खनल नावाच्या एका व्यक्तीला यशस्वीरित्या बाहेर काढले. बाहेर काढले तेव्हा त्याचे ओठ मोठ्याप्रमाणावर फाटले होते. तसेच त्याची नखेही पांढरी झालेली दिसत होती. जिवंत राहण्यासाठी स्वतःचे युरीन प्यायला असे ऋषिने सांगितले आहे.
जगण्याच्या सर्व आशा आपण सोडल्या होत्या. दबलेल्या ठिकाणी अनेक मृतदेह विखुरलेले होते. त्यांची फारच दुर्गंधी सुटली होती, असेही त्याने सांगितले. तरही लहान लहान दगडे फेकून बचाव पथकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न तो करत होता.

ग्रामीण भागात मोठे नुकसान
संयुक्त राष्ट्रांच्या स्थानिक समन्वयकाने नुकताच यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार प्राथमिक अंदाज आणि भूकंपाची तीव्रता पाहता 39 जिल्ह्यांमध्ये 80 लाख लोकांना या भूकंपामुळे फटका बसला आहे. त्यात सर्वाधिक 20 लाखाहून अधिक लोक दुर्गम भागातील 11 जिल्ह्यांमधील आहेत.
दरम्यान गोरखा जिल्ह्याच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नेपाळच्या ग्रामीण भागात लोकांच्या उपजिवीकेची साधने पूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यांना खायला प्यायलाही काहीही मिळत नसल्याचे चित्र आहे. भूस्खलनामुळे रस्त्यांवरही परिणाम धाला आहे. त्यामुळे या ग्रामीण भागाशी संपर्क साधणेही कठीण जात आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, नेपाळचे काही ताजे PHOTO