आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Films Cheating Girlfriends Reaction To His Fake Birthday Surprise

शाब्बास रे पठ्ठ्या! चीटर गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडने शिकवला असा धडा, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही अाजवर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात तरुण त्यांच्या गर्लफ्रेंडना वाढदिवसाला डोळे बंद करायला सांगतात, आणि दुसऱ्या खोलीत त्यांच्यासाठी सरप्राइज गिफ्ट ठेवलेले असते. ते पाहून गर्लफ्रेंड आनंदी होत असते. पण तसे प्रत्येकवेळी घडत नाही.

रायन बायफोर्ड नावाच्या एखा मुलाने बर्थडे सरप्राइजच्या नावावर त्याच्या गर्लफ्रेंड अशा धडा शिकवला जे ती जीवनात कधीही विसरू शकणार नाही. ही घटना अमेरिकेची आहे. रायनने त्याची गर्लफ्रेंड बियांकाचे डोळे टॉवेलने झाकलेले होते. तिला सरप्राइज देण्यासाठी म्हणून तो दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. त्यावेळी तो तिच्यासाठी हॅपी बर्थडे साँगही गात होता.

टॉवेल हटताच धक्का...
दुसऱ्या खोलीत प्रवेश केल्यानंतर बियांकाने जेव्हा डोळ्यासमोरून टॉवेल हटवला तेव्हा तिला चांगलाच धक्का बसला. तिचे सर्व सामान एका सूटकेस आणि खोक्यात पॅक केलेले होते. त्यामुळे बॉयफ्रेंड तिला सोडत असल्याचे तिच्या लक्षात आले. या दरम्यान तिचा बॉयफ्रेंड संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करत होता. बियांकाला काहीही कळत नव्हते. तिने रायनला याचे कारण विचारले तेव्हा रायनने तिला सांगितले की, तिने त्याच्याबरोबर चिटींग केली आहे. त्यामुळे आता तुला घरी जावे लागेल असे त्याने गर्लफ्रेंडला स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू होतो आणि कॅमेरा बंद होतो. त्यानंतर काय झाले याबाबत रायनने काहीही माहिती दिलेली नाही. यूट्यूबवर 59 लाखांपेक्षा अधिक लोकांना हा व्हिडिओ पाहिला आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTO