आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत भारतीय महिलेला जळत्या कारमध्ये सोडून ड्रायव्हर झाला पसार, जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क - अमेरिकेत एका अपघातानंतर कारने अचानक पेट घेतला. हे पाहताच गाडीचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. पीडित महिलेचे नाव हरलीन गरेवाल असून ब्रुकलिन येथे हा अपघात घडला. घटनास्थळावरून पसार झालेल्या ड्रायव्हरचे नाव सईद अहमद असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नेहमीच इतरांसाठी मदत करणारी हरलीन स्वतःची मदत करू शकली नाही असे तिचा बॉयफ्रेंड करण सिंगने सांगितले आहे. 
 

दुसरी टॅक्सी मागवून ड्रायव्हर पसार
- न्युयॉर्क डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, "महिला जळत्या कारमध्ये अडकलेली पाहूण ड्रायव्हरने कार सोडली. बाहेर येताच दुसऱ्या टॅक्सीमध्ये तो घटनास्थळावरून पसार झाला. अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत हरलीनचा मृतदेह जळून खाक झाला होता."
- दैनिकाने दिलेल्या माहितीप्रमाणे, या अपघातात ड्रायव्हर सईद सुद्धा जखमी झाला. त्याचा हात आणि पाय भाजला होता. तो उपचारासाठी मॅमोनीडेस मेडिकल सेंटरमध्ये पोहोचला. त्याच ठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले."

रुगणालयातून अटक
- पोलिसांनी चालकाची माहिती मिळताच त्याला रुगणालयात जाऊन अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रुकलिन न्यायालयातच त्याच्याविरुद्ध खटला चालणार आहे."

दारू पिल्याची कबुली
- स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सईद कथितरीत्या दारु पिऊन गाडी चालवत होता. मद्यधुंद असल्याने तो दुभाजकाला जाऊन धडकला आणि गाडीने अचानक पेट घेतला. आपण काही ड्रिंक्स घेतले होते अशी कबुली त्याने पोलिसांसमोर दिली आहे. 
- सईदचा भाऊ वहीदने माध्यमांचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले. तो स्वतः या अपघातात जखमी झाला होता. त्याने महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती भाजली होती. वाचवताना त्याचे हात पाय जळाले आहेत. यानंतरच तो उपचारासाठी रुगणालयात गेला होता असे त्याचा भाऊ म्हणाला. 
बातम्या आणखी आहेत...