आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅफेमध्ये लावला ‘मॅन टॅक्स’, ऑस्ट्रेलियात जाणीव जागृती आणि शिक्षण देण्यासाठी कॅफेचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- आधुनिक काळातही स्त्री-पुरुष असमानतेची समस्या दिसून येते. त्यावर ऑस्ट्रेलियातील कॅफेने आगळ्या पद्धतीने मार्ग शोधून काढला आहे. कॅफेमध्ये येणाऱ्या पुरुषांना कोणत्याही खरेदीवर १८ टक्के मॅन टॅक्स भरावा लागतो. त्यातून पुरुषांत स्त्री-पुरुष भेदाभेदाबद्दल जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न आहे.  

हँडसम हर नावाचा हा कॅफे आपल्या या नव्या करामुळे चर्चेत आला आहे. मेलबर्न शहरातील ब्रुन्सविकमध्ये हा कॅफे आहे. कॅफेमध्ये केवळ स्त्रीदाक्षिण्य नव्हे, तर महिलांना योग्य सन्मान देण्याची धडपड सुरू आहे. कॅफेमध्ये आसन व्यवस्थेत महिलांना प्राधान्य दिले जाते. पुरुषांना अतिरिक्त कर भरावा लागतो. महिन्यातून एक आठवडा हा कर लागू केला जातो, अशी माहिती कॅफेचे मालक अलेक्झांड्रा आेब्रियन यांनी दिली.  

विवेकावर अवलंबून
हँडसम हर कॅफेमध्ये पुरुषांसाठी असलेला अतिरिक्त कर अनिवार्य स्वरूपाचा नाही. तो पुरुषांसाठी ऐच्छिक आहे. या जगात स्त्री-पुरुष असमानता आहे, असे वाटत असेल तरच पुरुषाने कर भरायचा किंवा नाही याचा निर्णय घ्यावा. ही गोष्ट प्रत्येकाच्या विवेकावर अवलंबून आहे, असे आेब्रियन यांनी सांगितले.  

चांगली कल्पना
स्त्री-पुरुषांत अशा प्रकारची असमानता आहे. हेदेखील अनेक लोकांना ठाऊक नसते. त्यामुळे त्याची जाणीव करून देण्यासाठी ही कल्पना स्तुत्य म्हटली पाहिजे, असे कॅफेला भेट देणाऱ्या महिलेने सांगितले. 

पैसा धर्मादाय कार्यासाठी  
कॅफेमध्ये पुरुषांना कोणताही पदार्थ चाखल्यानंतर बिलासोबत अतिरिक्त कर द्यावा लागतो. पुरुषांनी हा कर भरला नाही तर त्यांना आम्ही तत्काळ कॅफेतून बाहेर काढत नाहीत. परंतु लिंग असमानतेची जाणीव आणि शिक्षण मिळावे यासाठी हा कर आहे. त्याबद्दल काही तरी चांगले करण्याची संधी पुरुषांनाही मिळते. कारण कराच्या रूपातून मिळणारी रक्कम आम्ही धर्मादाय कार्यासाठी देतो, असे अलेक्झांड्रा यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...