आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये इसिसचा हल्ला, 22 ठार; 12 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्टरमध्ये पॉप स्टार अॅरियाना ग्रँडच्या काॅन्सर्टमधील आत्मघाती स्फोटात जखमी झालेल्या तरुणीला मदत करताना ब्रिटिश पोलिस. - Divya Marathi
मँचेस्टरमध्ये पॉप स्टार अॅरियाना ग्रँडच्या काॅन्सर्टमधील आत्मघाती स्फोटात जखमी झालेल्या तरुणीला मदत करताना ब्रिटिश पोलिस.
लंडन - ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या आधीच १२ वर्षांतील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला झाला. मंगळवारी पहाटे सुमारे ३ वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) मँचेस्टरमध्ये पॉप स्टार अॅरियाना ग्रँडच्या काॅन्सर्टमध्ये झालेल्या आत्मघाती स्फोटात २२ जण ठार झाले, तर ६० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मृतांमध्ये मुले आणि किशोरांची संख्याच सर्वाधिक आहे. हल्लेखोरही घटनास्थळीच मारला गेला. अमेरिकी पॉप स्टार अॅरियाना सुरक्षित आहे.  
 
मॅँचेस्टर या ब्रिटनच्या औद्योगिक शहरात दक्षिण आशियाई लोक मोठ्या संख्येने राहतात. मृतांमध्ये कोणी भारतीय आहे की नाही हे स्पष्ट झाले नव्हते. भारतीय उच्चायुक्तालयाचे अधिकारी सातत्याने स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटले आहे की, हा एक भयावह दहशतवादी हल्ला आहे, अशा दृष्टीने पोलिस त्याकडे पाहत आहेत. सरकार त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इसिस या दहशतवादी संघटनेच्या समर्थकांनी स्फोटाआधी एक तास या प्रकाराबद्दल आनंद व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. लंडनमध्ये ७ जुलै २००७ रोजी झालेल्या स्फोटांनंतर ब्रिटनमधील हा सर्वात भीषण दहशतवादी हल्ला आहे. त्या हल्ल्यात ५२ जण ठार झाले होते, तर ७०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.  

मोसूल आणि रक्कात मुलांवर टाकलेले बॉम्ब मँचेस्टरला परतले
इसिस समर्थक ट्विटरवर या हल्ल्यानंतर जल्लोष करत आहेत. अब्दुल हक नावाच्या एका युजरने लिहिले, ‘ब्रिटनच्या हवाई दलाने मोसूल आणि रक्का येथे मुलांवर जे बॉम्ब टाकले होते, ते परतून त्यांच्याच मँचेस्टरमध्ये फुटले.’ अनेक लोक ‘लोन वूल्फ स्टाइल’मध्ये आणखी हल्ले करण्याचे आवाहन करत आहेत. काही दिवसांपासून युरोपात असे हल्ले वाढले आहेत.
 
नेत्यांच्या सभा रद्द
ब्रिटनमध्ये ८ जूनला सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे तेथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दहशतवादी हल्ल्यांनंतर बहुतांश राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक सभा रद्द केल्या आहेत.

भारतीय कॅब चालकाने दिली मोफत सेवा
स्फोटानंतर चहूकडे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. त्या वेळी भारतीय वंशाच्या एका शीख कॅब चालकाने माणुसकीचा प्रत्यय दिला. त्याने आपल्या कॅबमधून अनेक जखमींना तसेच इतर लोकांनाही सुरक्षित स्थळी पोहोचवले. त्याने टॅक्सीवर ‘फ्री टॅक्सी इफ नीडेड’ असे लिहिलेला कागद चिकटवला होता.
 
हल्लेखोराचे नेटवर्क पोलिस शोधत होते, २३ वर्षीय युवकाला अटक
ग्रेटर मँचेस्टरचे पोलिस प्रमुख इयाप हॉपकिन्स म्हणाले की, हल्लेखोर एकटाच होता. तो मारला गेला. तो एकटा काम करत होता की एखाद्या नेटवर्कचा भाग होता याचा तपास पोलिस करत आहेत. हल्लेखोराकडे देशी स्फोटके होती, त्याचा वापर करण्यात आला. सुरुवातीच्या तपासादरम्यान पोलिसांनी २३ वर्षांच्या एका युवकाला अटक केली आहे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा घटनेशी संबंधित फोटोज आणि व्हिडिओ...
 
 
बातम्या आणखी आहेत...