आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मँचेस्टर हल्ला: 4 संशयित अटकेत; थेरेसांनी आणखी हल्ले होण्याची शक्यता केली व्यक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मँचेस्टर दहशतवादी हल्ल्याच्या २४ तासांच्या आत ब्रिटिश पोलिसांनी हल्ल्याशी संबंधित चार संशयितांना अटक केली आहे. बंकिंगहॅम पॅलेसपासून प्रमुख स्थळी लष्कर तैनात करण्यात आले आहे. ब्रिटनच्या गल्ल्यांमध्ये लष्कराने गस्त घालण्याची २००३ नंतरची ही पहिलीच घटना आहे.
 
पंतप्रधान थेरेसा मे यांनी म्हटले आहे की, अजूनही धोका टळलेला नाही. देशात पुन्हा मोठा हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान,मँचेस्टर एरिनाचा २२ वर्षीय आत्मघाती दहशतवादी सलमान अबेदीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तो आधीच्या रात्रीच रेल्वेने लंडनहून मँचेस्टरला गेला होता आणि अलीकडेच लिबियाहून परतला होता. तेथे त्याला दहशतवादाचे प्रशिक्षण मिळाले होते.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, लिबियामार्गे सिरियाला पोहोचला होता अबेदी, तेथे दहशतवादाचे प्रशिक्षण मिळाले...
 
बातम्या आणखी आहेत...