आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमोहन यांनी रोखले होते अमेरिकन किलर प्रपोजल: एम. के. नारायणन यांचा गौप्यस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी विरोधकांच्या दबावामुळे नव्हे, तर अमेरिकेच्या एका खोडसाळ प्रवेशामुळे अमेरिकेसोबतचा अणुकरार रद्द करण्याचा इशारा दिला होता. ही माहिती तत्कालीन राष्ट्रीय सल्लागार एम. के. नारायणन यांनी दिली आहे. नारायणन यांनी म्हटले आहे की, अमेरिकन राष्ट्रपती जॉर्ज बुश भारत - अमेरिका नागरी अणुकराराची औपचारिक घोषणा करणार होते. त्याआधीच्या रात्री डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या टीमला अचानक सांगितले की, "डील बंद करा.'
भारताच्या या अचानक बदललेल्या भूमिकेचे कारण स्पष्ट करताना नारायणन यांनी सांगितले की, "अमेरिकन आयत्यावेळी एक खोडसाळ प्रस्ताव (किलर प्रपोजल) पुढे केला होता. त्यानुसार यात भारत केवळ दोन अणुभट्ट्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांबाहेर ठेवण्याची तरतूद होती. त्याआधी अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कोंडोलिसा राइस यांनी सांगितले की, भारतातील विरोधी पक्ष अणुकराराच्या विरोधात होते. त्यामुळे डॉ. सिंग यांनी १८ जून २००५ रोजी अणुकराराच्या प्रस्तावित घोषणेच्या आधल्या रात्री तो स्थगित करण्याचे निर्देश दिले होते.' प्रत्यक्षात अणुभट्ट्यांबाबतच्या तरतुदीत अमेरिकेने ऐनवेळी बदल केल्याने मनमोहन यांनी भूमिका बदलली होती.

अमेरिकेसाेबतच्या ऐतिहासिक अणुकराराला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित संमेलनात नारायणन यांनी म्हटले की, "मी काही तथ्ये स्पष्ट करू इच्छितो. १७ - १८ जूनच्या रात्री मनमोहनसिंग यांनी हा अणुकरार ऐनवेळी रोखल्याची खूप चर्चा झाली. त्याचाही योग्य इतिहास सर्वांना समजला पाहिजे, असे मला वाटते. हा करार तोपर्यंत होणे शक्य नव्हते, जोपर्यंत डॉ. मनमोहनसिंग यांचे कराराबाबत १५० टक्के समाधान झाले नसते.'
अमेरिकेला कठाेर संदेश
त्या रात्री १२.५ वाजता पंतप्रधानांनी हे स्पष्ट केले की, जर अणुऊर्जा आयोग व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या संख्येवर (दोन अणुभट्ट्या) करार पुढे नेण्यास तयार नसतील तर तो थांबवला जावा. सिंग यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेला कडक संदेश गेला. सिंग यांची ही भूमिका व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचल्यानंतर राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी राइस यांना सिंग यांच्या भेटीला पाठवले. तत्कालीन परराष्ट्रमंत्री नटवरसिंह यांच्या पुढाकाराने राइस - मनमोहन यांच्यात अणुभट्ट्यांची संख्या वाढवण्यावर चर्चा झाली. त्यानंतर सिंग यांनी करार पुढे नेण्यास सहमती दर्शवली.
ऐनवेळी बदलली अणुभट्ट्यांची संख्या
नारायणन यांनी सांगितले, " या करारानुसार भारतातील किती अणुभट्ट्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांच्या बाहेर ठेवायच्या, त्यांची संख्या किती असेल याबाबत पीएमओ व अमेरिकन राष्ट्रपती कार्यालयादरम्यान सहमती झाली होती परंतु अमेरिकेच्या परराष्ट्र विभागात भारताला धडा शिकवावा, असे वाटणारे काही लोक होते. त्यांनी ऐनवेळी ही संख्या कमी करून दोनवर आणली. ही संख्या भारत स्वीकारणे कधीच शक्य नव्हते.'
बातम्या आणखी आहेत...