आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडत्या विमानातून बाहेर पडला, रुग्णालयाच्या छतावर सापडला मृतदेह!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येथील   विमानतळावरून जाणारे विमान अगदी मोजक्या इमारतींच्या छतावरून हातांच्या अंतरावर उड्डान घेतात. - Divya Marathi
येथील विमानतळावरून जाणारे विमान अगदी मोजक्या इमारतींच्या छतावरून हातांच्या अंतरावर उड्डान घेतात.
 
मेक्सिको सिटी - उत्तर मेक्सिकोच्या सिनालोआ प्रांतात उडत्या विमानातून एक व्यक्ती बाहेर फेकल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना ह्या व्यक्तीचा मृतदेह त्याच परिसरातील एका रुग्णालयाच्या इमारतीच्या छतावर सापडला आहे.
अमली पदार्थ तस्करीसाठी कुप्रसिद्ध सिनालोआ प्रांतातील एलडोराडो विमानतळ शेतजमीन आणि विरळ वस्तीने व्यापला आहे. येथील विमानतळावरून जाणारे विमान अगदी मोजक्या इमारतींच्या छतावरून हातांच्या अंतरावर उड्डान घेतात. अशाच एका विमानातून एक व्यक्ती बुधवारी अचानक बाहेर फेकल्या गेला असे स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, स्थानिक वेळेनुसार बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. काही वेळातच रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक अधिकारी रुग्णालयाच्या छतावर पोहोचले असता त्यांना एक मृतदेह सापडला. छतावर पडला त्यावेळी तो जीवंत होता किंवा नाही हे स्पष्टपणे सांगता येणार नाही.

तस्करांचे कृत्य असल्याचा संशय
अमली पदार्थ तस्करांचा परिसर म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या सिनालोआ प्रांतात जगातील सर्वात कुख्यात अमली पदार्थ तस्कर अल चापो गुझमनची दहशत आहे. 2016 मध्ये अटक करण्यात आलेल्या चापोचे याच वर्षी अमेरिकेत प्रत्यर्पन करण्यात आले आहे. अल चापो तुरुंगात असला तरीही त्याच्या मुलाने तस्करी आणि हिंसाचार सुरूच ठेवला. त्यामुळे, एखाद्या तस्कराने या व्यक्तीला मारून फेकले असावे असा संशय सुद्धा पोलीस व्यक्त करत आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...