आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Many Deaths Reported In Crane Collapse At Mecca Grand Mosque

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मक्का मशिदीवर पडली क्रेन, 107 जणांचा मृत्यू, 9 भारतीयांसह 238 जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मक्का - सौदी अरबमध्ये शुक्रवारी रात्री मोठा अपघात झाला. मक्केतील 'अल हरम' या मुख्य मशिदीवर क्रेन कोसळून 107 जणांचा मृत्यू झाला असून 238 जखमी झाले आहेत. जखमींमध्ये नऊ भारतीयांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री आलेल्या प्रचंड वादळामुळे ही दुर्घटना घडली.

हज यात्रा अजून सुरू झाली नसल्यामुळे मशिदीत फारशी गर्दी नव्हती. या मुख्य मशिदीचा विस्तार करून ती मोठी करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी ही भली मोठी क्रेन लावण्यात आली आहे.

मोठ्या वादळाचा तडाखा बसून क्रेन पडल्याने मशिदीच्या छताचा काही भाग कोसळल्यामुळे जास्त लोकांचा मृत्यू झाला, असे स्थानिक प्रशासनाने सांगितले. मक्केत 2011 पासून मशिदीच्या विस्ताराचे काम सुरू आहे. त्यासाठी ही क्रेन लावण्यात आली होती.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईहून मक्केला जाणारे विमान रद्द होणार नाही. 21 ते 26 सप्टेंबरदरम्यान हज सुरू होणार आहे. भारतातून यंदा 52 हजार लोक मक्केत दाखल झाले आहेत. जगभरातून लाख मुस्लिम बांधव हज यात्रेसाठी मक्केत येण्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, मक्का येथील मशिदीत झालेल्या दुर्घटनेचे फोटोज...