आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US : न्यू ऑर्लियान्समध्ये फायरिंग, पार्कमध्ये अंदाधुंद गोळीबारात 16 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेत एका पार्कमध्ये फायरिंग झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना ऑर्लियांस पार्कची असल्याचे समजते आहे. याठिकाणी करण्यात आलेल्या अंदाधुंद गोळीबारात 16 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमध्ये किमान 16 लोक जखमी झाले असल्याची शक्यता आहे. मात्र अद्याप फायरिंगच्या मागे नेमके कारण काय, याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्कमध्ये व्हिडीओ फिल्मिंगचा इव्हेंट सुरू होता. त्यानंतर लोक त्याठिकाणी पार्टी करत होते. त्यादरम्यान काही जणांनी लोकांवर अंधाधुंद फायरिंग सुरू केले. गोळ्या लागलयानंतर अनेक लोक जमिनीवर कोसळले.

पोलिसही होते उपस्थित...
पोलिसांचे प्रवक्ते टेलर गँब्ले म्हणाले की, घटनेच्या वेळी याठिकाणी पोलिस उपस्थित होते. पण ते केवळ गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी होते. अचानक फायरिंग सुरू झाल्याने आम्हाला आणखी मदत बोलवावी लागली. तपास करणाऱ्यांना अद्याप फायरिंगमागचे कारण समजलेले नाही. मात्र त्यांनी शंका व्यक्त केली की, पार्कमध्ये दोन गट उपस्थित होते. त्यांच्यात झालेल्या वादामुळे ही घटना घडली असावी. विशेष म्हणजे या इव्हेंटसाठी परवानगीही घेण्यात आली नव्हती, अशी माहिती मिळाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा PHOTOS