आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: इंडोनेशिया होते हिंदुबहुल, आताही बालीत 90% हिंदू, आहे सर्वात मोठी सोन्‍याची खाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपाची त्‍वचा काढताना (फाइल फोटो) - Divya Marathi
सपाची त्‍वचा काढताना (फाइल फोटो)
जकार्ता - इंडोनेशियाची राजधानी जकार्तावर गुरुवारी दहशतवादी हल्‍ला झाला. त्‍या अनुषंगाने आम्‍ही सांगणार आहो या देशाविषयी खास माहिती...

सर्वात मोठे स्‍नेक मार्केट

इंडोशियात मोठ्या प्रमाणात साप मारले जातात. त्यांच्या कातडीपासून वेगवेगळ्या बॅग, जॅकेट, आणि बूट तयार केले जातात. त्यामुळे चमकणारे, रंगी-बिरंगी आणि जवळपास सर्वच प्रकारचे साप येथे मारले जातात.

इंडोनेशियातील सिरेबान गावात हा सर्व प्रकार घडतो. या ठिकाणी सापांचा मोठा कारखाना आहे. जेथे सौंदर्यवतींच्या हाता-पायांची शोभा वाढवण्यासाठी दिवसभर सापांचा नाहक बळी घेतला जातो. या सापांपासून तयार केलेल्या वस्तूंची किंमत 4000 डॉलरपेक्षाही जास्त असते.

अशाप्रकारे बनवतात सापांपासून वस्तू
सापाच्या डोक्यावर जोरात प्रहार केला जातो. त्यानंतर सापाच्या जबड्यात पाण्याचा पाइप टाकून पाणी सुरू केले जाते. सापाच्या पोटात पाणी गेल्याने तो फुग्याप्रमाणे फुगतो. 10 मिनिटे सापाला अशाच अवस्थेत ठेवले जाते. त्यांनतर सापाच्या तोंडावर चमड्याची दोरी बांधली जाते, ज्यामुळे पाणी बाहेर येईल. ही प्रक्रिया पूर्ण होताच सापाची कातडी शरीरापासून हळूहळू वेगळी होते. त्यानंतर साप मारण्यात एक्सपर्ट असणारे लोक निर्दयतेने सापाची कातडी बाजूला काढतात. यानंतर ती कातडी वाळवली जाते. पर्स, बूट आणि अन्य वस्तू तयार करण्यासाठी ती वापरली जाते. या वस्तूंना इंडोनेशियात खूप चांगली मागणी आहे.
सापाच्या मासालाही मिळते चांगली किंमत
सापाच्या कातडीपासून वस्तू तर बनवल्या जातातच मात्र सापांचे मासही महागड्या दराने विकले जाते. सापाचे मास खाल्ल्याने दमा आणि इतर काही आजार समुळ नष्ट होत असल्याचे मानले जाते.

पुढील स्‍लाइडवर वाचा, जगातील सर्वात मोठी सोन्‍याची खाण...