आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराक : 39 भारतीय कामगारांना IS ने केले ठार; इराकी अधिकाऱ्याची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
बगदाद - इराकमधील मोसूल येथून 15 जून 2014 रोजी ISIS ने 40 भारतीय बांधकाम कामगारांचे अपहरण केले होते, ते कुठे आहेत ? कसे आहेत ? याचा काहीच थांगपता नाही. दरम्‍यान, त्‍यांना 'इसिस'ने ठार केल्‍याची माहिती इराकी गुप्‍तचर संस्‍थेच्‍या अधिकाऱ्याने दिली. परंतु, ही माहिती खोटी असल्‍याचे भारतीय परराष्‍ट्र मंत्रालयाने सांगितले. त्‍यामुळे गूढ वाढले आहे.
40 पैकी एक जण पळून येण्‍यास यशस्‍वी
इसिसने 40 भारतीय कामगारांचे अपहरण केले होते. त्‍यापैकी हरजित मसीह नावाचा एक भारतीय इसिसच्‍या तावडीतून जीव वाचवून पळून येण्‍यास यशस्‍वी झाला. इतर 39 जणांची अद्याप काहीही माहिती नाही.
अपहरणाच्‍या काहीच दिवसानंतर हत्या...
> 'इंडियन एक्‍स्‍प्रेस'च्‍या वृत्‍तानुसार, कुर्दिश प्रादेशिक सरकारच्‍या एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याने ईमेलने सांगितले, "दहशतवाद्यांनी अपहरण केल्‍याच्‍या काहीच दिवसानंतर बदोश (मोसूलजवळ) येथे त्‍यांची गोळी मारून हत्‍या करण्‍यात आली. त्‍या नंतर त्‍यांना साहाजीच्‍या जवळ सामूहिकरीत्‍या दफन करण्‍यात आले."
> इराकी गुप्‍तचर संस्‍थेने केलेला तपास आणि राबवलेली शोध मोहीम या आधारे इराकी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

परराष्‍ट्र मंत्रालयाने केले खंडण
> इराकी अधिकाऱ्याच्‍या या माहितीचे भारतीय परराष्‍ट्र मंत्रालयाने खंडण केले.
> परराष्‍ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्‍हटले, सर्व भारतीय कामगार जिवंत असल्‍याची माहिती आम्‍हाला मिळाली आहे.
> जानेवारी 2016 मध्‍ये रमल्लाह येथे फलस्तीनचे अध्‍यक्ष प्रेसिडेंट महमूद अब्बास आणि सुषमा स्‍वराज यांची भेट झाली होती. यामध्‍ये त्‍यांच्‍या गुप्‍तचर संस्‍थेने भारतीय कामगार जिवंत असल्‍याचे सांगितले होते.
> या शिवाय इसिसने ओलीस ठेवलेल्‍या भारतीय कामगारांच्‍या सुटकेसाठी मदत करण्‍याचे आश्‍वासनसुद्धा पश्चिम आशियातील काही देशांनी भारताला दिले.
> मात्र, या पैकी एकाही देशांकडे या भारतीय कामगारांची काहीच माहिती नाही. एवढेच नाही तर त्‍यांच्‍याकडे या 39 जणांचा साधा फोटोदेखील नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, आयएसआयएसने कधी- कधी दिला क्रुर मृत्‍यूदंड...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)