आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूकंपाबद्दल ऐकले की या निरागस चेहऱ्यांवर उमटते नुसतेच हास्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी २५ एप्रिल रोजी नेपाळमधील प्रलयंकारी भूकंपाची भयावह छायाचित्रे आपण पाहिली असतील. मात्र, कित्येक तास ढिगाऱ्यांखाली दबून राहिलेल्या काही चिमुकल्यांची छायाचित्रे सुखावणारी होती. दैनिक भास्करने नेपाळमध्ये या मुलांची भेट घेऊन वर्षभरात तेथील जग किती बदलले ते जाणून घेतले...
हे बाळ २२ तासांनी सुखरूप
काठमांडूत ढिगाऱ्याखालून २२ तासांनी सोनिस अवाल या ६ महिन्यांच्या बाळाला वाचवले तेव्हा ते निरागस हसले हाेते. आता त्याला पाहण्यासाठी लोक त्याच्या घराबाहेर तासन््तास थांबतात.
आता...तो नेपाळचा लाडका
नेपाळ मधील हे सर्वात जगप्रसिद्ध बाळ आहे. सेानिस अवाल. भूकंपात घर पडले तेव्हापासून हे कुटुंबीय भक्तपूरच्या महाकाली मंदिराजवळ किरायाने राहतात. सोिनसची भेट झाली तेव्हाही तो हसला, अगदी ढिगाऱ्याखालून बाहेर काढले तेव्हा हसला होता तसाच. आईने त्याला नमस्कार करण्यास सांगितले, तर ते इवलेसे हात जोडून तो माझ्याकडे पाहू लागला. बाहेर त्याची बहीण सोनिया भेटली. सायंकाळ होती. सोनिया आई-वडिलांना पाणी भरण्यासाठी मदत करत होती. अर्धवट तयार असलेल्या या घराच्या पहिल्या मजल्यावर आम्ही पोहाेचलो. नेपाळमध्ये किरायाच्या घराला डेरा म्हणतात. अगदी मोजकेच सामान घरात होते. सोनिसच्या आईने पूर्वीचे सारे सामान जुन्या घराच्या ढिगाऱ्यात गमावले. नव्या घरात हे साहित्य घरमालकानेच दिले. स्वयंपाकाचे साहित्य व अंथरूण-पांघरूण मदत म्हणून मिळाले. माझी बॅग, कॅमेरे आणि पाण्याच्या बाटलीवर आता सोनिसने ताबा घेतला होता. कॅमेऱ्याचे फ्लॅश त्याला विचित्र वाटत नव्हते. त्याची बहीण सोनिया ११ वर्षांची आहे. मात्र, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ती विचार करून देते. भावाला भेटण्यासाठी खूप लोक येत असल्याचे तिने सांगितले. तो इतका प्रसिद्ध आहे याबद्दल तिला अभिमान व आनंदही आहे. यापूर्वी सोनिया व तिच्या आईला हिंदी पण व्यवस्थित बोलता येत नव्हते. आता तिच्या बोलण्यात प्रत्येक दुसऱ्या वाक्यात चार शब्द इंग्रजीचे असतात. मी विचारले, हिंदी इतकी चांगली कशी बोलता येते? ती म्हणाली, भारतातील मालिका टीव्हीवर पाहून बोलू लागले.
इंग्रजीचे शब्द त्याला सोनियाने सांगितलेल्या देशांच्या डॉक्युमेंट्री निर्माते आणि एनजीओच्या लोकांकडून मिळाले आहेत. घटनेच्या वेळी तो फक्त सहा महिन्यांचा होता. बहीण घरी टीव्ही पाहत होती. आई बाजारात गेली होती. भूकंप झाला तेव्हा सोनिस झोपलेला होता. भाऊ-बहीण दोघेही झोपलेले होते. २ तासांनंतर बहिणीला तर २२ तासांनंतर सोनिसला काढण्यात आले.
रसमिला म्हणते,‘जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा असे वाटले की दोन्ही मुले जगणार नाहीत. फण त्यांना काहीही झाले नाही.’ शेजारी राहणारे लोक त्यांना म्हणतात-‘तुमचा मुलगा देवाचे रूप आहे. म्हणूनच तर तो सहीसलामत बाहेर आला.’ नेपाळच्या परंपरेनुसार मुलांचा पहिला वाढदिवस साजरा केला जात नाही. या वर्षी सोनिसचा वाढदिवस साजरा केला जाईल.
रसमिला म्हणतात,‘आता घराबाहेर पडते तरीही त्याला एक क्षणभरही एकटे सोडत नाही.’ तो घराबाहेर पडतो तेव्हा लोक म्हणतात, हाच तो चमत्कारी मुलगा. गल्लीत भेटणाऱ्यांना तो हात जोडून नमस्कारही करतो आणि एक हात वर करून सलामही करतो. रसमिलाने मला तिचे जुने घरही दाखवले. सोनिस तेथे पडलेल्या विटांच्या तुकड्यांशी खेळणे समजून खेळायला लागला. त्याची बहीण जिन्याच्या पायऱ्यांवर खेळायला लागती. ती आधी तिथेच खेळत असे. रसमिला काही वेळ आपल्या जुन्या घराच्या आठवणींत रमून गेली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, हा ५ दिवसांनी निघाला जिवंत... निर्मला, एक पाय गमावला परंतु नृत्याची आवड,अभिनेत्री बनण्याचे स्वप्न कायम.... निमा , कृत्रिम पायाच्या मदतीने पुन्हा एकदा बास्केटबॉल खेळण्याची इच्छा.... संगीता : कुबड्या सोडून मुलांना मदत करण्याची इच्छा