आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्तकतेचा इशारा : ISIS च्‍या निशाण्‍यावर EURO चषक, युरोपवर आण्विक हल्‍ल्‍याचा धोका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - फ्रान्‍समध्‍ये होऊ घातलेल्‍या युरो 2016 फुटबॉल चॅम्पियनशिपवर आयएसआयएस हल्‍ला करण्‍याची तयारी करत आहे. या शिवाय युरोप आण्विक हल्‍ला होऊ शकतो. त्‍यामुळे सतर्क राहावे, असा इशारा इंटरनॅशनल लग्‍झमबर्ग फोरमने दिला. शुक्रवारपासून युरो चषक स्‍पर्धेला सुरुवात होणार असून, 11 जुलैला त्‍याची सांगता होणार आहे.
फोरम म्‍हटले, आयएसआयएसचे अनेक दहशतवादी युरोपमध्‍ये सक्रिय आहेत. त्‍यामुळे आण्विक हल्‍ल्‍याचा सर्वाधिक धोका युरोपलाच आहे. ते मोठा विनाश घडवून आणण्‍याचे नियोजन करत आहेत.
सीरियामध्‍ये रासायनिक शस्‍त्रांनी हल्‍ला...
> फोरमचे अध्‍यक्ष डॉ. मोशे कंतोर यांनी सांगितले, आयएसआयएसने यापूर्वी सीरियात रासायनिक शस्‍त्रांनी अनेक हल्‍ले केले आहेत.
> आता इसिस न्यूक्लियर अटॅक करण्‍याच्‍या विचारात आहे.
> पूर्व सोव्हिएत युनियनमधील अणू संशोधन केंद्राची सुरक्षा कमकुवत आहे.
> त्‍यामुळे पश्चिमेकडील देशांच्‍या राजधानींवर हल्‍ल्‍या होण्‍याची शक्‍यता अधिक आहे.
> हा सतर्कतेचा इशारा ज्‍या संस्‍थेने दिला आहे तिचे सदस्‍य रशियाच्‍या मंत्रीमंडळात मंत्री आणि वरिष्‍ठ अधिकारी आहेत.
> फुटबॉल स्‍पर्धेदरम्‍यान दहशतवादी हल्‍ला होऊ शकतो, असा इशारा त्‍यांनी दिला.
> पण, या स्‍पर्धेवर आण्विक हल्‍ला होऊ शकतो, असे त्‍यांनी म्‍हटले नाही. युरोपवर आण्विक हल्‍लाच्‍या धोका असल्‍याची भीती त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
बेल्जियन अणुऊर्जा केद्रांवर लक्ष
> अॅमस्टर्डममध्‍ये आयोजित एका आंतरराष्‍ट्री परिषदेमध्‍ये डॉ. कंतोर म्‍हणाले, दोन महिन्‍यांपूर्वी दहशतवाद्यांनी ब्रसेल्सवर हल्‍ला केला होता. आता ते तेथील अणुऊर्जा केद्रांवर लक्ष ठेवून आहेत.
> इसिसने यापूर्वीसुद्धा या केंद्रात पोहोचण्‍याचा प्रयत्‍न केला होता.
बातम्या आणखी आहेत...