आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानेच्‍या खालचे मानवी शरीर प्रथमच बदलणार चिनी डॉक्‍टर, डोनरही मिळाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्बिन (चीन) - एखाद्या व्यक्तीची मान दुसऱ्याच्या शरीरावर लावून खालचे शरीर पूर्ण बदलणे हे शक्य आहे का? त्याबाबत थोडा संशयच आहे, पण चीनचे एक ऑर्थोपेडिक सर्जन या दिशेने काम करत आहेत. त्यासाठी त्यांना एक बॉडी डोनरही मिळाला आहे. ते आहेत ६२ वर्षीय वांग हानमिंग. सहा वर्षांपूर्वी एका मित्रासोबत कुस्ती खेळत असताना त्यांना अर्धांगवायू झाला होता. तेव्हापासून त्यांचे मानेपासून खालचे पूर्ण शरीर निष्क्रिय आहे. आता पुन्हा सामान्य लोकांप्रमाणे चालू-फिरू शकावे, असे त्यांना वाटते. या शस्त्रक्रियेत मृत्यूचा धोका आहे, पण तरीही ते त्यासाठी तयार आहेत.
हार्बिन वैद्यकीय विद्यापीठातील ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. रेने या अशक्य वाटणाऱ्या शस्त्रक्रियेची तयारी करत आहेत. शस्त्रक्रियेद्वारे पूर्ण शरीर प्रत्यारोपित केले जाईल. त्यांनी एक टीम तयार केली असून ती संशोधन आणि तयारी करत आहे. ते शस्त्रक्रिया केव्हा करतील हे अद्याप निश्चित नाही. हार्बिन येथीलच मूळ निवासी असलेले डॉ. रेने यांनी अमेरिकेत १६ वर्षे व्यतीत केली असून, २०१२ मध्ये ते चीनला परतले आहेत. मानवाचे शरीर बदलण्याच्या त्यांच्या विश्वासाला काही आधार आहे. अमेरिकेच्या लुइसव्हिल युनिव्हर्सिटीच्या ज्या टीमने डोक्याचे प्रत्यारोपण केले होते, तीत ते सहभागी होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, उंदरावर यशस्‍वी झाली शस्‍त्रक्रिया...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)