आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US च्‍या LGBT नाइट क्लबममध्‍ये फायरिंगः 53 ठार, दहशतवादी हल्‍ल्‍याचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये अज्ञात बंदुकधाऱ्याने एका गे नाइट क्लबवर केलेल्या भीषण गोळीबारात 50 लोक ठार, तर 53 जखमी झाले आहेत. ऑरलँडोमध्ये असलेल्या गे क्लबमध्ये झालेला हा हल्ला अमेरिकेत 9/11 नंतर झालेला सर्वांत भीषण हल्ला आहे.

राष्ट्राध्यक्ष बराक अाेबामा यांनी हे कृत्य अतिरेकी अाणि द्वेषमूलक असल्याचे म्हटले अाहे. दरम्यान, एफबीआयच्या एका प्रवक्त्याने हा दहशतवादी हल्लाच असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, या हल्लेखोराचे नाव उमर सिद्दीकी मतीन असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले अाहे. त्याचे अाई-वडिल अफगाणिस्तानचे अाहेत. सीएनएन या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हल्लेखाेराची इसिस या दहशतवादी संघटनेशी जवळीक होती. 20 वर्षीय या हल्लेखोराने कमरेलाही स्फोटके बांधलेली होती. त्यामुळे तो दहशतवादीच असावा, या संशयाला बळकटी येत चालली आहे.

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतली नसली तरी हा दहशतवादी हल्लाच होता का, या दिशेने स्थानिक पोलिस तपास करत आहेत. या गोळीबारानंतर राज्यात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत हल्लेखोर मारला गेला.या हल्ल्याचे दहशतवादी वेबसाइटवर काैतुक सुरू अाहे.हल्लेखाेराविरुद्ध कारवाई हाेईपर्यंत गाेळीबारातील जखमी असे अडकले हाेते.

तीस तास भयंकर
शनिवारी रात्री उशिरा म्हणजे च्या सुमारास गे नाइटक्लबच्या आवारात अचानक गोळीबाराचा आवाज सुरू झाला. हल्लेखोराने सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करत मागच्या बाजूने प्रवेश मिळवला. काही लोकांना ओलिस ठेवून अंदाधुंद गोळीबार केला.

हा दहशतवादी हल्लाच
अमेरिकेतील एका सिनेटरने हा दहशतवादी हल्लाच असल्याचा दावा केला. तर, या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा स्वत: लक्ष ठेवून असल्याचे त्यांचे अंतर्गत सुरक्षाविषयक सल्लागार लिसा मोनॅको यांनी सांगितले.

सर्व शक्यतांची पडताळणी
दरम्यान,अमेरिकी तपास यंत्रणा (एफबीआय) या हल्ल्याचा तपास करताना दहशतवादासह इतर सर्व दिशांनी करत आहेत. हल्लेखोर हा दहशतवादी संघटनांकडे झुकलेला होता, अशी प्राथमिक माहिती तपासात हाती येत असी तरी अद्याप याबाबत खात्रीपूर्वक काहीही सांगता येणार नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

सुनियोजित हल्ला
हा हल्ला अत्यंत सुनियोजित संपूर्ण तयारीनिशी करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. हल्लेखोराकडे घातक शस्त्रास्त्रांसह एक हँडगन आणि काही उपकरणेही होती, असे ऑरलँडोचे पोलिस प्रमुख जॉन मीना यांनी सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज... यात दिसेल अमेरिकेत पसरलेली दहशत...