आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेश : हिंदू आश्रमात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची हत्‍या, आठवड्यातील चौथी घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पभना (बांगलादेश) - पभना शहरातील हेमायतपूरमध्‍ये शुक्रवारी सकाळी हिंदू आश्रमाच्‍या एका कर्मचाऱ्याची हत्या झाली. नित्यारंजन पांडे (वय 60) असे मृताचे नाव असून, ते मॉर्निंग वॉक करत होते. विशेष म्‍हणजे एका आठवड्यात अशा प्रकारे चौघांची हत्‍या झाली. त्‍यामुळे अल्‍पसंख्‍याक समाजामध्‍ये दहशत निर्माण झाली आहे.
असा केला हल्‍ला...
> नित्यारंजन हे मागील 40 वर्षांपासून ठाकूर अनुकूल चंद्रा सत्संग परतीर्थ हेमायतपूरधाम आश्रमात काम करत होते.
> ते नित्‍यनियमप्रमाणे मॉर्निंग वॉक करत होते.
> सकाळी 6.15 वाजता आश्रमपासून 200 यार्ड अंतरावर असलेल्‍या पभना मेंटल हॉस्पिटलच्‍या मेन गेटवर काही हल्‍लेखोरांनी त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला. यात त्‍यांचा घटनास्‍थळीच मृत्‍यू झाला.
पोलिस काय म्‍हणाले ?
> पोलिस अधीक्षक सलीम खान यांनी सांगितले, अद्याप कुणीही या हल्‍ल्‍याची जबाबदारी घेतली नाही. आमचा तपास सुरू आहे.
>- यामध्‍ये इस्लामिक कट्टरपंथींचा सहभाग असावा, असा संशयसुद्धा त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
सहा महिन्‍यांत 40 जणांची हत्‍या
> बांगलादेशात मागील सात दिवसांमध्‍ये नित्यारंजन पांडेसह चौघांचा खून करण्‍यात आला.
> तीन दिवसांपूर्वी हिंदू पुजारी आनंद गोपाल गांगुली यांची हत्या झाली होती.
> रविवारी एका वरिष्‍ठ पोलिस अधिकाऱ्याची पत्‍नी आणि ख्रिश्‍चन व्‍यावसायिकाची हत्‍या झाली.
> मागील काही दिवसांपासून बांगलादेशात अल्‍पसंख्‍याक, पुरोगामी विचारांचे लेखक आणि विदेशी नागरिकांवर हल्‍ल्‍यांचे प्रमाण वाढले आहे.
> जानेवारी 2016 पासून आतापर्यंत इस्लामिक कर्मठवाद्यांकडून 40 लोकांचा खून करण्‍यात आला, अशी माहितीसुद्धा पोलिसांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...