आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकच्या राजधानीत बाॅम्बहल्ल्यामध्ये ११९ ठार, इफ्तारनंतर केले लक्ष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृत्तसंस्था - बगदाद - ऐन रमजानमध्ये इराकच्या राजधानीत रक्तपात घडून आला. शनिवारी रात्री उशिरा बगदादच्या वर्दळीच्या बाजारपेठेत कार बाॅम्बने घडवण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या स्फाेटांत किमान ११९ जणांचा मृत्यू झाला, तर १४० हून अधिक जखमी झाले.

कार बाॅम्बने काराडामधील बाजारपेठेला लक्ष्य करण्यात आले. घटनेत ११४ जण ठार, तर १२४ जखमी झाले. ऐन रमजानदरम्यान ही घटना घडल्याने देशावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी रमजानच्या इफ्तारसाठी शिया समुदायासह अरब राष्ट्रांतील मुस्लिम नागरिकांची गर्दी झाली होती. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ऑनलाइन पोस्ट करून इसिसने सैतानी कृत्य केल्याचे कबूल केले आहे. त्याचबरोबर जाणीवपूर्वक शिया मुस्लिमांना लक्ष्य केल्याचेही संघटनेने मान्य केले आहे.

रविवारी सकाळी अग्निशमन दलाचे जवान तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांनी बाजारपेठेतील इमारतींचा आढावा घेतला. काही भागांत रविवारी दुपारपर्यंत स्फोटानंतरचे आगीचे लोट पाहायला मिळाले. रस्त्यावर सर्वत्र मृतदेहाचे खच पडलेले होते. मृतांमध्ये बहुतांश मुलांचा समावेश आहे. स्फोटाच्या तासाभरानंतर घटनास्थळावर रुग्णवाहिका दाखल झाली. हल्ल्यानंतर आगीचे लोट बाजारपेठेतील कपडा तसेच सेलफोनच्या दुकानांत पोहोचले. त्यामुळे दुकानांना आग लागली होती. दुसरी घटना पूर्व बगदादमध्ये घडली. त्यात ५ जण ठार, तर १६ जखमी झाले; परंतु या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. घटनेनंतर पंतप्रधान हैदर अबादी यांनी घटनास्थळाला भेट दिली.

नागरिकांचा रोष
देशातील वाढत्या हिंसाचाराला रोखण्यात इराकच्या सुरक्षा व्यवस्थेला अपयश आल्याने नागरिक संतापले आहेत. या हल्ल्यानंतर नागरिकांचा रोष अधिक ठळकपणे पाहायला मिळाला. पंतप्रधान हैदर अ-आबादी ‘चोर’ असल्याची घोषणाबाजी करणारे लोक दाखवणारे व्हिडिआे फुटेज सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहे. त्याचबरोबर घटनास्थळी आलेल्या आबादी यांच्या वाहनावर दगडफेकही झाली.

फलुजाह ताब्यात घेतल्याचा सूड
इसिसच्या ताब्यातील फलुजाह शहरावर सरकारी फौजांनी गेल्या आठवड्यात पुन्हा ताबा मिळवला होता. त्यामुळे इसिसला शहरातून पळ काढावा लागला होता. हे शहर स्वतंत्र झाल्याची घोषणा झाली. त्याच्या आठवड्यानंतर ही घटना घडली आहे. इसिसच्या ताब्यात अजूनही देशातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे मोसूल शहर आहे.
रमजानच्‍या गर्दीला केले टार्गेट
या बॉम्‍बस्‍फोटामुळे बाजारपेठेतील अनेक दुकाने आणि परिसरात उभ्‍या असलेल्‍या कारचे नुकसान झाले. रमजानच्‍या खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. त्‍यांनाच हल्‍लेखोरांनी टार्गेट केले.

इस्लामिक स्टेटने स्‍वीकारली जबाबदारी
हे स्‍फोट एवढे भीषण होते की त्‍यामुळे परिसरातील अनेक इमारतींना तडे गेले. इस्लामिक स्टेटने त्‍याची जबाबदारी स्‍वीकारली आहे.
लोकांनी पंतप्रधानाच्‍या ताफ्यावर केली दगडफेक
या हल्‍ल्‍यामुळे नागरिक संतप्‍त झाले. त्‍यामुळे त्‍यांनी पंतप्रधानाच्‍या ताफ्यावर दगडफेक करून आपला रोष व्‍यक्‍त केला.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...