आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षय ऊर्जेमुळे भारत बदलाची नांदी, अमेरिकेकडून कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारताने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात २०२२ पर्यंत १७५ गिगावॅट्सचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. भारत या माध्यमातून परिवर्तनाची नांदी ठरू शकतो. मात्र हे उद्दिष्ट वाटते तितके सोपे नक्कीच नाही. त्याची पूर्तता कठीण असल्याचे अमेरिकेच्या ऊर्जा नूतनीकरण विभागाच्या मंत्री मेलेनी नाकागावा यांनी म्हटले आहे.

सध्या भारताने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी १ खर्व एवढ्या निधीची गरज भासणार आहे. रस्त्यांपासून बंदरापर्यंत विकासाच्या अनेक संधी भारतात आहेत. देशाला शाश्वत असे भवितव्य आहे. हा प्रश्न केवळ राजकीय इच्छाशक्तीपुरता मर्यादित नाही. त्यासाठी योग्य सुधारणा, योजना आणि त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. त्यानंतरच हे प्रत्यक्षात पाहायला मिळू शकते. १७५ गिगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारताला १०० अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज भासणार आहे. हे उद्दिष्ट केवळ सरकारच्या तिजोरीवर अवलंबून राहून होणार आहे. त्यासाठी खासगी गुंतवणूक अनिवार्य ठरेल. २०२२ पर्यंत सौर ऊर्जेच्या योजनेला चालना देण्यासाठी देशात दिसून आलेली राजकीय इच्छाशक्ती अत्यंत सकारात्मक आहे. हे गुंतवणुकीसाठी चांगले संकेत मानले पाहिजेत, असे नाकागावा यांनी सांगितले. दोन्ही देश या मुद्द्यावर परस्परांच्या सोबत काम करत आ हे.
उभय देशांचे परस्पर सहकार्य
अमेरिका आणि भारत यांनी क्लीन एनर्जी फायनान्स टास्क फोर्सची स्थापना केली आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये त्याची सुरुवात झाली आहे. त्यात ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आणि अर्थविषयक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. खासगी क्षेत्रासाठीदेखील एका फोरमची सुरुवात करण्यात आली आहे. उदय केमखा त्याचे प्रमुख आहेत.
बातम्या आणखी आहेत...