आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

NSG सदस्‍यत्‍व : रशियाचा भारताला पाठिंबा, चीनला विरोधाचा जाब विचारणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंट पीटर्सबर्ग - अणू पुरवठादार गटांमध्‍ये (NSG) भारताला सदस्‍यत्‍व मिळावे, यासाठी रशियाने पाठिंबा दिला. एवढेच नाही तर भारताच्‍या NSG सदस्‍यत्‍वाला विरोध का करत आहात, याचा जाबही चीनला विचारणार असल्‍याचे रशियाचे अध्‍यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्‍हटले. येत्‍या 24 ते जूनदरम्‍यान सेऊल येळे NSG देशांची बैठक होणार आहे.
पुतिन यांनी अजून काय म्‍हटले ...
> एका मुलाखतीत पुतीन यांनी भारताला पाठिंबा देण्‍याबाबत सांगितले. त्‍यामुळे भारताची दावेदारी भक्‍कम झाली आहे.
> आता विचार केला तर केवळ चीनच असा एकमेव शक्‍तीशाली देश आहे की जो भारताला सदस्‍यत्‍व मिळू नये, यासाठी विरोध करत आहे.
> पुतिन म्‍हणाले, ''सेहूलमध्‍ये होणाऱ्या बैठकीत आम्‍ही भारताच्‍या सदस्‍यत्‍वाचा मुद्दा उपस्‍थ‍ित करणार आहोत. एवढेच नाही तर चीन याचा का विरोध करत आहेत, याचा जाबही विचारला जाईल.''
> त्‍यांनी हेही म्‍हटले, हे सदस्‍यत्‍व मिळावे यासाठी भारताशिवाय जेही देश प्रयत्‍न करत आहेत त्‍यांचाही विचार केला जाऊ शकतो.
भारत-अमेरिकेच्‍या मैत्रीचा रशिया संबंधावर परिणाम नाही
पुतीन यांनी हेही सांगितले, ''भारत आणि रशियाचे संबंध खूप जुने आहेत. त्‍यामुळे सध्‍या भारत आणि अमेरिका यांच्‍यात वाढत असलेल्‍या जवळीकतेमुळे त्‍यावर काहीही फरक फडणार नाही,'' असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.
परराष्ट्र सचिव जाणार चीनला
एनएसजी सदस्यत्वासाठी पाठिंबा मिळवण्याकरिता परराष्ट्र सचिव एस. जयशंकर या आठवड्यात चीनला जाणार असल्‍याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाची माहिती.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सदस्‍यत्‍व मिळाल्‍याने काय फायदा होणार ?
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...