आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झिका व्‍हायरस आशियात, सिंगापूरमध्‍ये आढळले 115 बाधित, 13 भारतीयांचाही समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापूर/नवी दिल्ली - झिका व्‍हायरसने आशियात धडक दिली असून, सिंगापूरमध्‍ये 115 व्‍यक्‍ती बाधित आढळल्‍या. यापैकी 13 जण भारतीय, 21 चिनी तर 6 बंगलादेशी आहेत. यात एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. सिंगापूरमध्‍ये सुरुवातीला 18 बांधकाम कामगारांना या आजाराची लागण झाली होती. त्‍या नंतर अनेक रुग्‍ण समोर आले. ब्राजीलमध्‍येही या व्‍हायरसचा प्रचार होत आहे.
भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाने दिला दुजोरा
> भारताच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ता विकास स्वरूप म्‍हणाले,, "सिंगापूरमध्‍ये असलेल्‍या 13 भारतीय नागरिक झिका बाधित आढळले.''
> सिंगापूरच्‍या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि नॅशनल एन्वायरमेंट एजेंसी (NEA) नुसार, ज्‍या गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली ती औद्योगिक वसाहतीत राहत होती. या आजाराचे लक्षणे दिसताच बुधवारी तिला हॉस्पिटलमध्‍ये भरती करण्‍यात आले. डॉक्‍टर तिच्‍यावर आणि तिच्‍या गर्भावर लक्ष ठेवून आहेत.

बांगलादेशाचे 6, चीनचे 21 लोक जिका बाधित
> सिंगापूरमध्‍ये 6 बांगलादेशी तर 21 चिनी लोकांनाही याची लागण झाली आहे, दोन्‍ही देशांच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयांनी या बाबत माहिती दिली.
> मलेशियातीलही एका 58 वर्षीय महिलेला या आजाराची लागण झाली.
सिंगापूरमध्‍ये युद्ध पातळीवर मोहीम
> डासांच्‍या उत्‍पतीवर नियंत्रण मिळवण्‍यासाठी सिंगापूर आरोग्‍य विभाग युद्ध पातळीवर काम करत आहे.
> अधिकारी घरोघरी जाऊन पाहणी करत आहेत.
> डासांना मारण्‍यासाठी सार्वजनिक ठिकाणी फॉगिंग मशीनचा वापर केला जात आहे.
> NEA च्‍या अधिकाऱ्यांनी सांगितले, 'ज्‍या भागात सर्वाधिक बाधित व्‍यक्‍ती आढळल्‍या त्‍या ठिकाणी आम्‍ही सर्वप्रथम स्‍वच्‍छता मोहीम राबवत आहोत.'
US ने दिली वॉर्निंग
> सिंगापूरमधील ज्‍या गर्भवती महिलेला झिकाची लागण झाली तिला सिंगापूरच्‍या बाहेर जाऊ देऊ नका, अशी सूचना अमेरिकेने दिली.
> दुसरीकडे ऑस्ट्रेलिया, तायवान आणि दक्षिण कोरियाने सिंगापूरला पर्यटनासाठी जात असलेल्‍या आपल्‍या नागरिकांना सर्तक केले.
1970 मध्‍ये भारत आणि पाकिस्‍तानात आढळला होता विषाणू
या आजाराचा विषाणू 1970 च्या दशकात पाकिस्तान, भारत, मलेशिया आणि इंडोनेशियामध्येही आढळला होता. तशी नोंद आरोग्‍य विभागाकडे आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे झिका व्‍हायरस आणि काय आहे माइक्रोसेफली?
बातम्या आणखी आहेत...