आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Air France Flights To Paris Diverted After Bomb Threats

पोलिस ऑपरेशन संपले, पॅरिस हल्ल्याच्या सूत्रधाराच्या मृत्यूचे गूढ कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिसच्या सेंट डेनिसमध्‍ये बुधवारी झालेल्या गोळीबार दरम्यान एलिट फोर्सचा कमांडो दिसत आहे. - Divya Marathi
पॅरिसच्या सेंट डेनिसमध्‍ये बुधवारी झालेल्या गोळीबार दरम्यान एलिट फोर्सचा कमांडो दिसत आहे.
पॅरिस - फ्रान्‍सची राजधानी पॅरिसमध्‍ये पाच दिवसांपूर्वी दहशतवादी हल्‍ले झाले. त्यानंतर आज (बुधवारी) पॅरिसजवळील सेंट डेनिसमध्‍ये छापेमारी सुरू असताना पोलिसांवर गोळीबार झाला. या ठिकाणी बॉम्‍बस्‍फोटाचे सात आवाजही ऐकायला मिळाले. आठ तासानंतर पोलिसांनी सेंट डेनिसमधील आपली तपास मोहिम पूर्ण केली. अद्याप पॅरिस हल्ल्याचा मुख्‍य सूत्रधार अब्देलहामिद अबाऔदच्या मृत्यूबाबत खात्री झालेली नाही.
दरम्‍यान, पोलिसांनी एका दहशतवादी महिलेला अटक करण्‍याचा प्रयत्‍न केला असता तिने आत्‍मघातकी हल्ला करीत स्‍वत:ला उडवले. यात तिच्‍यासह एक पोलिस कर्मचारी ठार झाला. पोलिसांनी या महिलेसह तीन दहशतवाद्यांना ठार मारले.

फ्रान्‍समधील प्रसार माध्‍यमांनी दिलेल्‍या वृत्‍तानुसार, पाच दिवसांपूर्वी हल्‍ल्‍यातील नवव्‍या दहशतवाद्यांचा पोलिस पाठलाग करत होते. परंतु, त्‍याने पोलिसांवर फायरिंग केली. यात एक पोलिस शहीद तर जखमी झाला. दहशतवाद्यांना पकडण्‍यासाठी फ्रान्‍सने आतापर्यंत 2000 पेक्षा अधिक ठिकाणी छापे मारलेत. दरम्‍यान, अमेरिकेतून येत असलेले दोन विमान वळवले.

अपडेट्स
> पॅरिसमध्‍ये पुन्‍हा झाले सात बॉम्‍बस्‍फोट
> पोलिसांच्‍या मदतीसाठी आर्मी पोहोचली
> पॅरिस हल्‍ल्‍याचा सूत्रधार अब्देलहामिद अबाऔद याला टारगेट करून पोलिसांनी ऑपरेशन सुरू केले आहे.
> 'टेलीग्राफ'च्‍या वृत्‍तानुसार, तीन संशयितांना अटक केली आहे.
> फ्रेंच वृत्‍तपत्र 'ले मोंडे' बुधवारी जे दोन लोक ठार झाले आहेत त्‍यांची ओळख पटली नाही. दरम्‍यान, यातील एक पोलिस कर्मचारी असल्‍याचे सांगितले जात आहे.
> फायरिंगमुळे सेंट डेनिससह पॅरिसच्‍या काही भागात वाहतूकबंदी करण्‍यात आली.
> प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले की, आम्‍ही अर्ध्‍या रात्री जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकला.
> फायरिंगमध्‍ये एक पोलिस ठार झाला तर अन्‍य एक जखमी आहे. यापूर्वी शुक्रवार-शनिवारच्‍या मध्‍यरात्री पॅरिसमध्‍ये दहशतवादी हल्‍ला झाला होता. यात 129 लोक ठार तर 300 पेक्षा अधिक जखमी झाले.

व्‍हीडियोमध्‍ये दिसला नववा हल्‍लेखोर
> पाच दिवसांपूर्वी झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या व्‍हीडिओमध्‍ये नववा दहशतवादी दिसत असल्‍याचे पोलिसांनी सांगितले. तो मध्‍य पॅरिसमध्‍ये बार आणि कॅफेच्‍या बाहेर इतर दहशतवाद्यांनी वापरलेल्‍या कार जवळ उभा होता. तो फरार सलाह अब्देस्लाम असल्‍याचा पोलिसांना संशय आहे.
> या हल्‍ल्‍याची जबाबदारी आयएसआयएसने दावा केला की, आम्‍ही आठ हल्‍लेखोर पाठवले होते.
अमेरिकेतून फ्रान्‍सकडे जाणाऱ्या फ्लाइट्स वळवल्या, बॉम्‍ब हल्‍ल्‍याची धमकी
बॉम्‍ब हल्‍ला करण्‍याची धमकी मिळाल्‍यानंतर अमेरिकाच्‍या लॉस एंजिलिसकडून आज (बुधवार) येत असलेल्‍या फ्रान्‍स एयरच्‍या दोन फ्लाइट्स अचानक सॉल्टलेक सिटीकडे वळवण्‍यात आल्‍या. त्‍यामुळे एकच गोंळध उडाला.
या बाबत फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशनने दिलेल्‍या माहिती नुसार, ''या विमानांनी लॉस एजिलिसवरून पॅरिसकडे उड्डाण घेतली होती. दरम्‍यान, एयर फ्रांस फ्लाइट 65 ला सिक्युरिटीच्‍या कारणाने सॉल्टलेक सिटीकडे वळवण्‍यात आले. ''दुसरे विमान जे की, वॉशिंगटनवरून पॅरिसकडे जात होते त्‍यालाही नोवा स्कोटिया विमानतळावर सुरक्षित उतरवण्‍यात आले.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा व्हीडिओ आणि संबंधित फोटोज...