आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Belgiam Police Fail To Find Paris Attacks Key Suspect Salah Abdeslam

बेल्जियम पोलिसांनी छापे मारले, पॅरिस हल्‍ल्‍यातील दहशतवादी पुन्‍हा फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सालाह अब्देसलाम - Divya Marathi
सालाह अब्देसलाम
ब्रसेल्स - पॅरिस हल्‍ल्‍यानंतर दहशतवाद्यांना पकडण्‍यासाठी छापा सत्र सुरूच असून, रविवारी बेल्जियम पोलिसांच्‍या विशेष पथकाने 22 ठिकाणांवर छापे मारले. दरम्‍यान, 16 संशयितांना ताब्‍यात घेतले असून, सालाह अब्देसलाम हा कुख्‍यात दहशतवादी फरार होण्‍यास यशस्‍वी झाला, अशी माहिती बेल्जियम पोलिसांच्‍या वकिलांनी आज (सोमवार) दिली.
बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मायकल म्‍हणाले, ''पॅरिसप्रमाणे आमच्‍या देशातही दहशतवादी हल्‍ला करू शकतात, हेच हेरून संपूर्ण देशात हाय अलर्ट घोषित करण्‍यात आला'', अशी माहिती त्‍यांनी दिली. दरम्‍यान, ब्रसेल्समध्‍ये सोमवारी सर्व शाळा, कॉलेज यांना सुटी देण्‍यात आली असून, मेट्रो ट्रेनही बंद करण्‍यात आली.
यापूर्वीसुद्धा पळाला होता अब्देसलाम
बेल्जियममध्‍ये फ्रान्‍सचे तीन भाऊ 26 वर्षांपासून राहतात. त्‍यापैकी सर्वात धोकादायक असलेला अब्देसलाम हाच पॅरिस हल्‍ल्‍यातील आठवा दहशतवादी असल्‍याचे सांगण्‍यात येते. मात्र, फ्रान्‍सने केलेल्‍या कारवाईत तो पळून जाण्‍यास यशस्‍वी ठरला. त्‍यानंतर ब्रसेल्सचे उपनगर मोलेनबीकमधील त्‍याच्‍या घरावर पोलिसांनी छापा मारला. परंतु, याही वेळी त्‍याने पोलिसांना चकमा दिला असून, पोलिसांनी त्‍याच्‍या एका भावाला ताब्‍यात घेऊन सोडून दिले.
प्रशासनाने काय सांगितले
> मोलेनवीक, ब्रसेल्सशिवाय पोलिसांनी आणखी तीन शहरात छापे मारले.
< यात कुठलाही स्‍फोटक पदार्थ किंवा शस्‍त्र आढले नाही.
> ताब्‍यात घेतलेल्‍या व्‍यक्‍तींची चौकशी सुरू आहे.
< पॅरिस हल्‍ल्‍यातील दहशतवादी अब्देसलाम याला पकडण्‍यासासाठी हे छापे मारण्‍यात आलेत.
> सालाह अब्देसलाम पळून जाण्‍यास यशस्‍वी ठरला
< रेडच्‍या पूर्वी शेकडो पोलिसांनी रस्‍त्‍यांवर नाकेबंदी केली होती.

पुढील स्लाइड्सवर संबंधित PHOTOS ...