आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Taunts France: We Are Waiting For You And Your Doom

फ्रान्‍सच्‍या प्रत्‍युत्‍तराची ISIS ने केली थट्टा, म्‍हटले -\'तुम्‍हीही बुशप्रमाणे मुर्खपणा कराल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - पॅरिस दहशतवादी हल्ल्याच्या हल्लेखोरांची धरपकड करण्यासाठी फ्रान्स पोलिसांनी बुधवारी पहाटे सेंट डेनिस उपनगरात एका अपार्टमेंटवर हल्ला चढवला. यात हल्ल्याचा मुख्‍य सूत्रधार अब्देलहमेद अबाऊद याने स्‍वत:ला आत्‍मघातकी बॉम्‍ब उडवले असा दावा काही प्रसार माध्‍यमांनी केला. पण, अब्देलहमेद ठार झाला की जिवंत आहे, हे रहस्‍य अजून कायम आहे. दरम्‍यान, आयएसआयएसने एक व्‍हीडिओ प्रसारित करून फ्रान्‍सच्‍या प्रत्‍युत्‍तराची थट्टा केली.
आयएसआयएसने म्‍हटले, 'फ्रान्‍सच्‍या प्रत्‍युरामुळे आम्‍ही घाबरलो नाही. उलट त्‍यांच्‍या (फ्रान्‍स) अंताची वाट पाहात आहोत. आम्‍हाला माहिती आहे की तुम्‍ही बुश (अमेरिकेचे माजी राष्ट्रपती) प्रमाणे मुर्खपणा करणार आहात. तेव्‍हा बुश यांनी आपल्‍याच देशाच्‍या अर्थव्‍यस्‍थेला सुरुंग लावला होता,'' अशा शब्‍दांत आयएसआयएसने फ्रान्‍सची थट्टा उडवली.

दुसरीकडे फ्रान्‍सच्‍या नागरिकांनी घाबरू नये. पूर्वीप्रमाणेच मोकळेपणाने जगावे, असे आवाहन राष्‍ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांनी केले. त्‍यांनी म्‍हटले ''कुठलेच भय न बाळगता कॅफेत जा, संग्रालयत फिरा, मोकळेपणाने जगा.''
काय आहे 'इसिस'च्‍या व्‍हीडिओमध्‍ये
> 'वूई आर वेटिंग फॉर यू अँड युवर डूम' या नावाने दहशतवाद्यांनी हा व्‍हीडिओ प्रसारित केला.
> यामध्‍से फ्रेंच भाषेत आयएसआयएस दहशतवादी म्‍हणतो, '' "तुमच्‍या प्रत्‍युतरामुळे आम्‍ही घाबरलो आहोत असे तुम्‍हाला वाटते का ? तसे अजिबात नाही, आम्‍ही केवळ तुमच्‍या अंताची वाट पाहतोय."
> व्‍हीडिओमध्‍ये इंग्रजी आणि अरबी या दोन भाषेत उपशीर्षक आहेत. दहशतवाद्यांनी पहिल्‍यांदाच इंग्रजीचा जास्‍त वापर केला आहे.
> दहशतवादी म्‍हणतो, "तुमच्‍याकडून काही वाचवण्‍यासाठी आम्‍ही तुम्‍हाला युद्धबंदीचा प्रस्‍ताव दिला होता. मात्र, तुम्‍ही त्‍याला विरोध केला. आता तुमचा पराभव निश्चित आहे. "
मास्टरमाइंड और महिला फिदायीन के बारे में सस्पेंस बरकरार
> काही वृत्‍तपत्रांनी दावा केला की, पॅरिसमध्‍ये पोलिस आणि एलिट फोर्सने केलेल्‍या कारवाईत अब्देलहामिद ठार झाला. दरम्‍यान, फ्रान्‍स सरकारकडून अधिकृत काहीही सांगण्‍यात आले नाही.
> फ्रान्‍सच्‍या जवानांनी ज्‍या अपार्टमेंटवर कारवाई केली त्‍यात अब्देलहामिदच राहत होता. परंतु, कारवाईच्‍या वेळी तो घरात होता की नाही, हे अजून निश्चित नाही.
> फ्रान्‍सच्‍या भारतातील दुतावासाचे अधिकारी फ्रांसिओस रिचीअर यांच्‍या नुसार, सेंट डेनिसमध्‍ये कार्रवाईदरम्‍यान मास्टरमाइंड अब्देलहामिदने स्‍वत:ला अडवून आत्‍महत्‍या केली.
> मात्र, स्‍वत:ला बॉम्‍बने उडवणारी दुसरी व्‍यक्‍ती ही मास्टरमाइंड अब्देलहामिदचे पत्‍नी आहे. दरम्‍यान, ती अब्देलहामिदची बहीण असल्‍याचा दावा काही प्रसार माध्‍यमांनी केला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, व्‍हीडिओचे स्क्रीनशॉट्स...