आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Italian Wounded In Latest Attack On Foreigners In Bangladesh

बांगलादेशात इटालीन पारदीवर गोळीबार, मुस्‍लीम कट्टपंथीयावर संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्‍थळाची पाहणी करताना स्‍थानिक पोलिस अधिकारी. - Divya Marathi
घटनास्‍थळाची पाहणी करताना स्‍थानिक पोलिस अधिकारी.
ढाका - बांगलादेशातील दिनाजरपूर येथे अज्ञात हल्‍लेखोरांनी आज (बुधवार) सकाळी एका इटालीन ख्रिश्‍नच फादरवर दुचाकीवरून येत गोळीबार केला. यात फादर गंभीर जखमी झाला आहे. हा हल्‍ला मुस्‍लीम कट्टरपंथीयांनी केला, असा संशय व्‍यक्‍त केला जात आहे. यापूर्वी 28 सप्‍टेंबरला ढाकाच्‍या डिप्लोमेटिक झोनमध्‍ये इटलीच्‍या एका सामाजिक कार्यकर्त्‍यानी गोळी मारून हत्‍या केली होती.
पोलिसांनी काय म्‍हटले ?
स्‍थानिक पोलिस अधिकारी रबिउल आलम यांनी एका वृत्‍त वाहिनीला सांगितले की, हा हल्‍ला बसस्‍थानकाजवळ झाला. हल्‍लेखोर हे दुचाकीवरून आले होते. त्‍यांनी इटलीच्‍या एका नागरिकावर गोळीबार केला. यात तो गंभीर जखमी झाला.
सामाजिक काम करत होता फादर
ज्‍या फादरवर हा हल्‍ला झाला ते सामाजिक काम करत होते. गरिबांवर मोफत इलाज, शिक्षण, प्रवचन यात ते अग्रेसर असत.
अमेरिकेने दिली होता इशारा
बंगलादेशात विदेशी नागरिकांवर हल्‍ला होऊ शकतो, असा इशारा अमेरिकेने दिला होता. शिवाय अमेरिकेच्‍या नागरिकांनी बांगलादेशात सर्तक राहण्‍याची सूचनाही दिली होती.